ॲड.विष्णुजी गोडबोले यांची अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/11/2026 8:58 AM

नांदेड :- नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळीत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते तथा विधिज्ञ ॲड. विष्णुजी नारायण गोडबोले यांची भारत सरकार नोंदणीकृत अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून,जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती ही राज्यव्यापी स्तरावर कलावंतांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेली संघटना आहे. कलावंत, साहित्यिक,वारकरी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे,त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे,तसेच कलावंतांना योग्य सन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.
ॲड.विष्णुजी नारायण गोडबोले यांनी सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.विविध सामाजिक चळवळींशी असलेली त्यांची बांधिलकी, समाजहितासाठीचा पुढाकार आणि जनसामान्यांच्या प्रश्नांबाबतची तळमळ लक्षात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी संघटनेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होण्यास मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा लाभ संघटनेला मिळणार असून, राज्यातील कलावंत,साहित्यिक व वारकरी बांधवांच्या प्रश्नांना संघटनात्मक बळ मिळेल,असा विश्वासही व्यक्त होत आहे.
या नियुक्तीबद्दल महाराष्ट्रातील तमाम कलावंत,साहित्यिक, वारकरी तसेच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे सर्व सभासद,प्रमुख पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या वतीने ॲड.विष्णुजी नारायण गोडबोले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून,त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या