जामखेड पुरवठा विभागाचा संथ कारभार? रेशन कार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी सात-सात महिने प्रतीक्षा! तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा
जामखेड पुरवठा विभागाचा संथ कारभार? रेशन कार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी सात-सात महिने प्रतीक्षा!
तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार; प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याची मागणी
जामखेड : जामखेड तालुक्यात रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज करूनही नागरिकांना सात-सात महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार समोर आली आहे. पुरवठा विभागाच्या या विलंबामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिक आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करतात. मात्र, अर्ज करून अनेक महिने उलटूनही नावाची नोंद होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित सदस्यांना रेशन धान्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होते.
या प्रश्नाची गंभीर दखल घेत पत्रकार रवीकुमार शिंदे यांनी तहसीलदार, जामखेड, जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे.
या तक्रारीत जामखेड तालुका पुरवठा विभागाकडे प्रलंबित असलेल्या अर्जांची तपासणी करावी, सात-सात महिने प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत, विलंबाची कारणे स्पष्ट करावीत, तसेच संबंधित विभागाच्या कामकाजाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय नागरिकांना अर्जाची सद्यस्थिती कळविण्याची व्यवस्था करावी आणि भविष्यात अशा प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी निश्चित कालमर्यादेत कामकाज करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
नेमके किती अर्ज प्रलंबित आहेत? नागरिकांना सात-सात महिने प्रतीक्षा का करावी लागत आहे? संबंधित अर्जांवर कार्यवाही का होत नाही? या प्रश्नांची उत्तरे जामखेड पुरवठा विभागाने द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या रेशन कार्डसंबंधी प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी पत्रकार रवीकुमार शिंदे यांनी केली आहे.
पत्रकार रवीकुमार शिंदे
संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर
Executive Member – AIMA MEDIA
Ahilyanagar District, Maharashtra
All India Media Association
हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक
भारतीय पत्रकार अधिकार – महाराष्ट्र राज्य
#जामखेड #जामखेडतहसील #पुरवठाविभाग #रेशनकार्ड #रेशनकार्डनावनोंदणी #रेशनकार्डसमस्या #अहिल्यानगर #जिल्हाधिकारीअहिल्यानगर #नागरिकांचेतक्रार #पत्रकाररवीकुमारशिंदे #आपलंसत्यअहिल्यानगर #महाराष्ट्रबातम्या