भगूरच्या विकासाला मिळणार नवी गती; शहरातील विविध विकासकामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 22/11/2026 9:45 AM

भगूरच्या विकासाला मिळणार नवी गती; शहरातील विविध विकासकामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर

​भगूर (प्रतिनिधी):

भगूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ. प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील विविध अत्याधुनिक आणि लोकोपयोगी विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, या निधीमुळे भगूर शहराचा कायापालट होणार आहे.

​या मंजूर निधीतून शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच पर्यावरणपूरक उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे.

​मंजूर झालेली प्रमुख विकासकामे आणि निधीची तरतूद खालीलप्रमाणे आहे:

  • ​महिला सभागृह: महिलांच्या विविध उपक्रमांसाठी सुसज्ज महिला सभागृह उभारणीसाठी ३७ लाख ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

  • ​ईव्ही (EV) चार्जिंग स्टेशन: शहरात आधुनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी १७ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • ​ईव्ही (EV) कार्ट (इलेक्ट्रिक वाहन): पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी आणि नागरी सुविधेसाठी ईव्ही कार्ट खरेदीकरिता १५ लाख ६० हजार रुपये मंजूर झाले आहेत.

  • ​क्रांती चौक विकास: शहराचे प्रमुख आकर्षण असलेल्या क्रांती चौकाच्या सुशोभीकरण आणि विकासासाठी १५ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

  • ​वॉटर एटीएम आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर मशीन: नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर एटीएम व सॅनिटरी इन्स्पेक्टर मशीनसाठी १२ लाख ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

  • ​सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन: महिलांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने शहरात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन व डिस्पोजल मशीन बसवण्यात येणार आहेत.

​या विकासकामांमुळे भगूर शहर अधिक सुंदर, आधुनिक आणि सुविधांनी परिपूर्ण बनण्यास मोठी मदत होणार आहे. "विकासाचा ध्यास आणि भगूरच्या प्रगतीचा विश्वास या भूमिकेतून शहराच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत," अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष सौ. प्रेरणा विशाल बलकवडे यांनी व्यक्त केली आहे. भा.ज.पा., राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उ.बा.ठा.) आघाडीच्या माध्यमातून भगूरच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही या निमित्ताने सांगण्यात आले आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या