'मान्यवरांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र कपिलधार येथे शिवा संघटनेच्या ३१ व्या राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन - प्रा.मनोहर धोंडे

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/11/2026 7:46 AM

नांदेड :- शिवा- अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या निमित्त श्री क्षेत्र कपिलधार, ता. जि. बीड येथे होणाऱ्या यात्रेमध्ये 'शासकीय महापुजा' व 'भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळावा' आयोजित केला जातो. सन १९९६ पासुन राज्यव्यापी मेळावा आणि सन २००२ पासुन श्री क्षेत्र कपिलधार येथील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजिवन समाधिची शासकीय महापुजा बीडचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, धर्मगुरु व शिवा संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते दुपारी ४.०० वाजता करण्याची परंपरा आहे. मागील २५ वर्षापासुन शासकीय महापुजा तर मागील ३१ वर्षापासुन शिवा संघटनेचा राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजित केला जातो. त्यामुळे यंदाही दि. २४ नोव्हेबर २०२६ रोज मंगळवारी दुपारी ठिक ४.०० वाजता २५ वी शासकीय महापुजा आणि शिवा संघटनेचा ३१ वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शिवा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव-लिंगायत समाजाच्या मान्यवरांना 'शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार' जाहिर केले असुन, सन्मान चिन्ह व सन्मान पत्रासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देवुन यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. देशातील वीरशैव लिंगायत समाजात अत्यंत प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरणासह महापुजा व शिवा संघटनेचा भव्य मेळावा होणार आहे. त्यासाठी पालकमंत्री तथा उप मुख्यमंत्री मा. ना. सुनेत्राताई पवार, मा.ना. पंकजाताई मुंडे, सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री मा.आ.धनंजय भाऊ मुंडे, माजी मंत्री मा. जयदत्त आण्णा क्षिरसागर, माजी मंत्री मा. सुरेश आण्णा नवले,
आ. संदिप भैय्या क्षिरसागर, यांच्यासह अनेक शिवाचार्य, शिवा संघटनेचे राष्ट्रीय राज्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे अध्यक्ष व उ‌द्घाटक म्हणून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे हे राहणार आहेत.

शिवा- अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने सन १९९६ पासुन म्हणजेच शिवा संघटनेच्या स्थापनेपासून प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पोर्णिमेच्या दिवशी वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेले श्रीक्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे शिवा संघटनेचा राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजित केला जातो. त्यानिमीत्ताने महाराष्ट्रासह तेलंगणा व कर्नाटक राज्यातुन सुमारे ५ ते ६ लाख वीरशैव लिंगायत समाज बांधव दर्शनासाठी व शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी पायी दिंड्या आणि वाहन रॅलीच्या माध्यमातुन उपस्थित होत असतात.

शिवा संघटनेच्या मागणीनुसार पंढरपुर प्रमाणेच श्रीक्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे वीरशैव संत, श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजिवन समाधीची प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पोर्णिमेच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून शासकीय महापुजा सन २००२ पासुन करण्यात येत आहे. सदरची महापुजा शिवा संघटनेच्या मागणीनुसार व लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या आग्रहावरून तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी सन २००२ पासुन सुरुवात केली आहे. त्यानुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. आर आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०६ सप्टेंबर २००७ आणि दि. १४ मार्च २००८ रोजी मंत्रालयात शिवा संघटनेच्या सोबत संपन्न झालेल्या बैठकीत श्री क्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेनिमीत्त होणाऱ्या यात्रेत कार्तिक शुध्द पोर्णिमेच्या दिवशी दुपारी ठिक ४.०० वाजता महाराष्ट्र शासनाच्या वतीने किमान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी शासकीय महापुजा करावी असे ठरले आहे. त्यानुसार यंदाही श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजिवन समाधिची शासकीय महापुजा करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री मा. ना. सुनेत्राताई पवार, पर्यावरण मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे, सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री मा. आ. धनंजय भाऊ मुंडे, मा. जयदत्त अण्णा क्षिरसागर, मा. सरेश अण्णा नवले यांच्यासह शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह अनेक गुरुवर्य व शिवा संघटनेचे राष्ट्रीय-राज्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे प्रति वर्षा प्रमाणे यंदाही श्री क्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे यावर्षीचा शिवा संघटनेचा ३१ वा राज्यव्यापी मेळावा व २५ वी शासकीय महापुजा दि. २४ नोव्हेबर २०२६ रोज मंगळवारी दुपारी ठिक ४.०० वाजता संपन्न होणार असल्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वीरशैव लिंगायत समाज बाधव आणि बहुजन समाज बांधवानी ढोल ताश्याच्या गजरात, जय शिवा चा नारा देत जल्लोषात हजारोंच्या संख्येने श्री क्षेत्र कपिलधार येथे दुपारी ३.०० वाजेपर्यंत उपस्थित रहावे असे आवाहान शिवा संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या