बाळूभाऊ राऊत मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;आअमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते उद्घाटन;शेकडो रक्तदात्यांनी केले रक्तदान

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/11/2026 5:15 AM

नांदेड :- महापुरुषांचे विचार आणि शहीद जवानांच्या त्यागाचे स्मरण सामाजिक उपक्रमांतून जपण्याच्या उद्देशाने बाळूभाऊ राऊत मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.दि.२२ नोव्हेंबर २०२६ वार रविवार रोजी नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरात शेतकरी पुतळ्याच्या शेजारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, गुरुनानक जयंती,संत रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी तसेच २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. आमदार अमरनाथ राजूरकर यांनी शिबिराला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.तसेच गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
बाळूभाऊ राऊत मित्र मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. रक्तदानासारख्या सेवाभावी उपक्रमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचे कार्य मंडळाकडून केले जात आहे.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी उमेश पाटील यांच्यासह रतन दुधाटे,प्रकाश कांबळे,पिंटू राऊत, गजू पांढरे,ओमकार यादव,प्रमोद देवकते,राजू गायकवाड,बंडू गिरगावकर,जयकुमार राऊत तसेच बाळूभाऊ राऊत मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

Share

Other News

ताज्या बातम्या