नांदेड येथे २३ नोव्हेंबर रोजी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा;आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी १ हजार जागांची संधी ; नामांकित कंपन्यांचा सहभाग

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/11/2026 7:26 AM

नांदेड : मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र नांदेड व श्री गुरुगोबिंदसिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वा. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत (PMNAM) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या भरती मेळाव्यामध्ये सर्व इंजिनिअरिंग व नॉन इंजिनिअरिंग ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, एकूण १ हजार उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

या मेळाव्यामध्ये TATA DLT, MAHINDRA, BAJAJ, FIAT, AUROPLEX, LEAR, SANY WIND, HAIR, JABIL, BAURE, FEROCIA आणि VICTORIA या नामांकित औद्योगिक कंपन्या सहभागी होणार आहेत.

इच्छुक आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी सोमवार २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी  ११ वा. श्री गुरुगोविंदसिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या