राज यादव यांची सेन्सॉर बोर्डाच्या मुंबई सल्लागार मंडळावर नियुक्ती

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/11/2026 7:31 AM

नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया विभागाचे प्रदेश सदस्य राज यादव यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्डाच्या (सीबीएफसी) मुंबई येथील सल्लागार मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या शिफारसीवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला महत्त्वाच्या जबाबदारीची संधी मिळवून देत खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ हे देशात चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडते. चित्रपटांचे परीक्षण, त्यातील आशय, सामाजिक परिणाम तसेच प्रेक्षकांच्या दृष्टीने योग्य प्रमाणन यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये मंडळाची भूमिका असते. अशा महत्त्वपूर्ण संस्थेच्या मुंबई येथील सल्लागार मंडळावर राज यादव यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.
या नियुक्तीमुळे राज यादव यांचे राजकीय, सामाजिक तसेच चित्रपट क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या