राणाप्रताप तरुण मंडळाच्या सहा खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/11/2026 1:37 AM


कुपवाड : येथील राणाप्रताप तरुण मंडळाच्या सहा खेळाडूंची अहिल्यानगर येथे दि. २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या ६२ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावणाऱ्या राणाप्रताप मंडळाच्या संघातील चार खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये मंडळाचा अनुभवी खेळाडू अक्षय मासाळ याच्यासह आयुष लाड, ओम पाटील आणि हर्षद शिंदे यांचा समावेश आहे.

तसेच जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या राणाप्रताप मंडळाच्या संघातील शुभांगी बंडगर आणि अंजली वाघे या दोन खेळाडूंची वरिष्ठ महिला संघात निवड झाली आहे.

या स्पर्धेसाठी जिल्हा पुरुष संघाचे मार्गदर्शक म्हणून मंडळाचे राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. सचिन चव्हाण काम पाहणार आहेत. तसेच या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या निवड समिती सदस्यपदी मंडळाचे सदस्य व राष्ट्रीय पंच सोमनाथ ऊर्फ शेखर स्वामी यांची नियुक्ती झाली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सहाही खेळाडूंचे राणाप्रताप मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

या खेळाडूंना राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, अजित पाटील, रमेश पाटील, प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा. सचिन चव्हाण, विशाल बन्ने, शिवसागर पाटील, महेंद्र पाटील, प्रा. विजय पाटील, विजय पाडळे, सागर नरदेकर, महेश कर्नाळे, अतुल पाटील, अनिल पाटील, शेखर स्वामी, राहुल गवळी, धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे, शितल कर्नाळे, अक्षय पाटील, धनंजय पाटील, तक्षक गौडाजे, सुनील सुतार, अभिषेक कर्नाळे, निलेश पवार, अमोल पाटील, अभिजीत सुतार, शुभम पाटील, दीपक पाडळे, स्वप्नील पाटील, अनिल हिरेकुर्ब, पोपट नरदेकर, वासुदेव जमदाडे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या