भगूरमध्ये ६७ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न; अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनचेही लोकार्पण!

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 07/11/2026 3:56 AM

भगूरमध्ये ६७ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न; अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनचेही लोकार्पण!

​भगूर (वार्ताहर):

भगूर नगर परिषदेच्या वतीने वसुबारसेच्या मुहूर्तावर भगूर शहरात विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या हस्ते ६७ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या विकासनिधी अंतर्गत मारवाडी गल्ली रस्ता काँक्रिटीकरण व ड्रेनेज कामासाठी ४७ लाख १७ हजार ४९७ रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच आठवडे बाजार ते नमो उद्यान रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवणे व परिसराच्या सुशो्रीकरणासाठी १९ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून याद्वारे शहराच्या सौन्दर्यात भर पडणार आहे.

​अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनचे लोकार्पण:

या कार्यक्रमादरम्यान शहराच्या स्वच्छता यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनचे लोकार्पण करण्यात आले. या यंत्राद्वारे गटारी, चेंबरा व सांडपाणी वाहिन्यांमधील गाळ सहजरित्या काढणे शक्य होणार आहे. यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना थेट गटारात उतरून काम करण्याची गरज बऱ्याच प्रमाणात कमी होणार असून स्वच्छतेच्या आधुनिक तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे.

​नागरिकांसाठी विविध सुविधा आणि आगामी प्रकल्प:

ज्येष्ठ नागरिक व पर्यटकांच्या सोयीसाठी शहरात दोन ई-ऑटो रिक्षा बग्गी, गर्भवती महिलांसाठी छोटे रुग्णालय, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन व ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी दिली. तसेच आगामी २१ डिसेंबर २०२६ रोजी नमो उद्यानाचे उद्घाटन होणार असून, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट, क्रांती चौकात १५ लाखांचे सुशोभीकरण आणि केवळ 'एक रुपयात पाणी' देणारे वॉटर एटीएम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी एकनाथराव शेटे, मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल, उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, शंकर करंजकर, दिपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, अॅड. विशाल बलकवडे, सुदेश वाळझाडे, मृत्युंजय कापसे, अमोल इंदारखे, सागर चंद्रमोरे, फरीद शेख, जयश्री देशमुख, लताताई थापेकर, विद्या बलकवडे, सुजाता शिरसाट, सुचित्रा बुर्के, रमेश पवार, प्रशांत कापसे, शिवाजी करंजकर, दादासाहेब देशमुख, मधुकर कापसे, युनुस शेख, शांताराम शेटे, कमलाकर देशमुख, विशाल शिरसाट, चंद्रशेखर ओहोळ, सुमित चव्हाण, श्याम देशमुख, निलेश हासे, अनिल कासार, युसुफ पटेल यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्याने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप शेटे यांनी मानले. 

Share

Other News

ताज्या बातम्या