नांदेड : दिवाळीचा आनंद केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता तो गरजू, निराधार आणि वंचितांच्या आयुष्यातही फुलविण्याच्या उद्देशाने गेल्या ७ वर्षांपासून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून महावीर चौकात सुरू असलेल्या ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ या उपक्रमांतर्गत यंदाच्या दिवाळीत ७ दिवसांत तब्बल १५० किलो मिठाई वाटप मोहिमेचा शुभारंभ लायन्स उपप्रांतपाल ला. योगेश जायस्वाल यांच्या हस्ते व प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उत्साहात करण्यात आला.
सुरुवातीला धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची पार्श्वभूमी, सातत्य आणि सामाजिक महत्त्व विशद केले. आपल्या प्रिय व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त किंवा स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदान करण्याची इच्छा असलेल्या दानशूरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. केवळ ₹२,००० देणगी देऊन एका दिवसाच्या अन्नदानात सहभागी होता येते. संबंधित दात्यांच्या हस्ते सकाळी १० वाजता ४० भोजनाचे डबे ठेवून गरजूंना वितरित केले जातात. या उपक्रमाची छायाचित्रे सोशल मीडियावरही प्रसिद्ध केली जातात. एका दिवसात जास्तीत जास्त ३ दात्यांना अन्नदानाची संधी दिली जाते.
उद्घाटनप्रसंगी योगेश जायस्वाल, सतीश शर्मा आणि स्नेहलता जायस्वाल यांच्या शुभहस्ते गरजूंना मिठाई तसेच भोजनाचे डबे वितरित करण्यात आले. पहिल्या दिवशी पुणे येथील अविनाश चिंतावार यांच्या सौजन्याने बुंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात आले.
गेल्या ७ वर्षांपासून सुरू असलेला ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ हा उपक्रम केवळ अन्नदानापुरता मर्यादित नसून माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक आदर्श उपक्रम ठरला आहे. दिवाळीच्या सणात अनेक गरजू कुटुंबांना मिठाईचा गोडवा अनुभवता यावा, या हेतूने ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान एकूण १५० किलो विविध प्रकारच्या मिठाईचे वितरण करण्यात येणार आहे.
या मोहिमेत दररोज शेकडो गरजूंना मिठाई देण्याबरोबरच धनगरवाडी येथील विविध संस्थांमध्येही मिठाईचे वाटप केले जाणार आहे. तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनाही दिवाळीचा गोडवा देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. धनगरवाडी अनाथाश्रमासाठी शिवाजी पवार, सुमन बालगृहासाठी स्नेहलता जायस्वाल, अंध विद्यालयासाठी वर्षा देशमुख, संध्याछाया वृद्धाश्रमासाठी भास्कर रामचंद्र खिडेकर, मूकबधिर विद्यालयासाठी अक्षय गोदमगावकर, मतिमंद विद्यालयासाठी ला. योगेश जायस्वाल, रिमांड होमसाठी संजय उत्तरवार, महिला केंद्रासाठी सतीश शर्मा, सांगवी वृद्धाश्रमासाठी दिलीप ठाकूर यांनी योगदान दिले आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी एका अज्ञात दात्यानेही मदतीचा हात पुढे केला आहे.
येत्या ६ नोव्हेंबर रोजी राजू देशमुख यांच्या सौजन्याने बालुशाही, ७ नोव्हेंबर रोजी प्रकाश कटारे यांच्या सौजन्याने बेसन लाडू, ८ नोव्हेंबर रोजी सुरेश पळशीकर यांच्या सौजन्याने करंजी, ९ नोव्हेंबर रोजी उद्धव तुळशीराम चौधरी यांच्या सौजन्याने रवा लाडू, १० नोव्हेंबर रोजी प्रमोद कुरे यांच्या सौजन्याने मैसूर पाक, तर ११ नोव्हेंबर रोजी आल्हाद गोदमगावकर यांच्या सौजन्याने काला जामूनचे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेशसिंह ठाकूर, प्रभुदास वाडेकर, जगतकाका ठाकूर आणि महेंद्र शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
(बातमी प्रसिद्धीसाठी)
नांदेड : दिवाळीचा आनंद केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता तो गरजू, निराधार आणि वंचितांच्या आयुष्यातही फुलविण्याच्या उद्देशाने गेल्या ७ वर्षांपासून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून महावीर चौकात सुरू असलेल्या ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ या उपक्रमांतर्गत यंदाच्या दिवाळीत ७ दिवसांत तब्बल १५० किलो मिठाई वाटप मोहिमेचा शुभारंभ लायन्स उपप्रांतपाल ला. योगेश जायस्वाल यांच्या हस्ते व प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उत्साहात करण्यात आला.
सुरुवातीला धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची पार्श्वभूमी, सातत्य आणि सामाजिक महत्त्व विशद केले. आपल्या प्रिय व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त किंवा स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदान करण्याची इच्छा असलेल्या दानशूरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. केवळ ₹२,००० देणगी देऊन एका दिवसाच्या अन्नदानात सहभागी होता येते. संबंधित दात्यांच्या हस्ते सकाळी १० वाजता ४० भोजनाचे डबे ठेवून गरजूंना वितरित केले जातात. या उपक्रमाची छायाचित्रे सोशल मीडियावरही प्रसिद्ध केली जातात. एका दिवसात जास्तीत जास्त ३ दात्यांना अन्नदानाची संधी दिली जाते.
उद्घाटनप्रसंगी योगेश जायस्वाल, सतीश शर्मा आणि स्नेहलता जायस्वाल यांच्या शुभहस्ते गरजूंना मिठाई तसेच भोजनाचे डबे वितरित करण्यात आले. पहिल्या दिवशी पुणे येथील अविनाश चिंतावार यांच्या सौजन्याने बुंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात आले.
गेल्या ७ वर्षांपासून सुरू असलेला ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ हा उपक्रम केवळ अन्नदानापुरता मर्यादित नसून माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक आदर्श उपक्रम ठरला आहे. दिवाळीच्या सणात अनेक गरजू कुटुंबांना मिठाईचा गोडवा अनुभवता यावा, या हेतूने ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान एकूण १५० किलो विविध प्रकारच्या मिठाईचे वितरण करण्यात येणार आहे.
या मोहिमेत दररोज शेकडो गरजूंना मिठाई देण्याबरोबरच धनगरवाडी येथील विविध संस्थांमध्येही मिठाईचे वाटप केले जाणार आहे. तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनाही दिवाळीचा गोडवा देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. धनगरवाडी अनाथाश्रमासाठी शिवाजी पवार, सुमन बालगृहासाठी स्नेहलता जायस्वाल, अंध विद्यालयासाठी वर्षा देशमुख, संध्याछाया वृद्धाश्रमासाठी भास्कर रामचंद्र खिडेकर, मूकबधिर विद्यालयासाठी अक्षय गोदमगावकर, मतिमंद विद्यालयासाठी ला. योगेश जायस्वाल, रिमांड होमसाठी संजय उत्तरवार, महिला केंद्रासाठी सतीश शर्मा, सांगवी वृद्धाश्रमासाठी दिलीप ठाकूर यांनी योगदान दिले आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी डॉ . व्यंकटेश सुधा प्रदीप देशपांडे तसेच एका अज्ञात दात्यानेही मदतीचा हात पुढे केला आहे.
येत्या ६ नोव्हेंबर रोजी राजू देशमुख यांच्या सौजन्याने बालुशाही, ७ नोव्हेंबर रोजी प्रकाश कटारे यांच्या सौजन्याने बेसन लाडू, ८ नोव्हेंबर रोजी सुरेश पळशीकर यांच्या सौजन्याने करंजी, ९ नोव्हेंबर रोजी उद्धव तुळशीराम चौधरी यांच्या सौजन्याने रवा लाडू, १० नोव्हेंबर रोजी प्रमोद कुरे यांच्या सौजन्याने मैसूर पाक, तर ११ नोव्हेंबर रोजी आल्हाद गोदमगावकर यांच्या सौजन्याने काला जामूनचे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेशसिंह ठाकूर, प्रभुदास वाडेकर, जगतकाका ठाकूर आणि महेंद्र शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना दिलीप ठाकूर यांनी सांगितले की, दिवाळीचा खरा आनंद दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने या उपक्रमात सहभागी होऊन माणुसकीची दिवाळी साजरी करावी.
मिठाई व भोजनाचे डबे वाटपाचा हा उपक्रम दररोज सकाळी १० वाजता पंचवटी हनुमान मंदिर, महावीर चौक, नांदेड येथे सुरू राहणार आहे. दानशूरांनी ९४२१८ ३९३३३ या क्रमांकावर गुगल पे अथवा फोनपेच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.“आपली एक मिठाई… कुणाची तरी संपूर्ण दिवाळी गोड करू शकते!” हा संदेश देत माणुसकीचा हा उपक्रम नांदेडकरांच्या सहकार्याने अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
मिठाई व भोजनाचे डबे वाटपाचा हा उपक्रम दररोज सकाळी १० वाजता पंचवटी हनुमान मंदिर, महावीर चौक, नांदेड येथे सुरू राहणार आहे. दानशूरांनी ९४२१८ ३९३३३ या क्रमांकावर गुगल पे अथवा फोनपेच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
“आपली एक मिठाई… कुणाची तरी संपूर्ण दिवाळी गोड करू शकते!” हा संदेश देत माणुसकीचा हा उपक्रम नांदेडकरांच्या सहकार्याने अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.