नांदेड:-तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब मध्ये पारंपारिक रीति प्रमाणे दिपावली कार्यक्रमाचे शुभारंभ 'पहिला दिवा' सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ जी जत्थेदार साहिब यांच्या शुभहस्ते व गुरुद्वारा बोर्डाचे सचिव - स. रविंद्र सिंघ बुंगई यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलीत करुन या दिपावली कार्यक्रमांचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक स. रविंदर सिंघ कपुर, सहा. अधिक्षक स. जैमल सिंघ ढिल्लो, सहा. अधिक्षक स. बलविंदर सिंघ फौजी व अधिकारी व गणमान्य व्यक्तींच्या व साध संगत च्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.