आपणा सर्वांना सांगितल्याप्रमाणे, उषःकाल हॉस्पिटल ते दांडेकर मार्ग परिसरातील बंद असलेले पथदिवे बदलण्याच्या कामाला माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे.
याचप्रमाणे आपल्या संपूर्ण प्रभागातील ज्या-ज्या ठिकाणी पथदिवे बंद आहेत, दुरुस्तीची आवश्यकता आहे किंवा नवीन पथदिवे बसवणे गरजेचे आहे, अशा सर्व ठिकाणांची कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील.
यासाठी मला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे.
आपल्या परिसरातील एखादा पथदिवा बंद असेल, वारंवार बिघडत असेल किंवा आवश्यक ठिकाणी प्रकाशव्यवस्था नसेल, तर कृपया त्या ठिकाणाची माहिती मला थेट वैयक्तिक फोन करून कळवावी.
आपण कळवलेल्या प्रत्येक समस्येची नोंद घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल आणि आवश्यक कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील.
आपल्या प्रभागातील प्रत्येक रस्ता सुरक्षित आणि प्रकाशमान असावा, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.
आपल्या सूचना, समस्या आणि सहकार्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
📞 थेट संपर्क : अभिजीत भोसले – 93268 99991
मयूर खटावकर – 86691 39072
आपलाच,
अभिजीत शकुंतला दत्तात्रय भोसले
नगरसेवक तथा सदस्य, स्थायी समिती
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका
प्रभाग क्रमांक १८