दिवाळी सणानिमित्त आज शनिवारी सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळ पाणी पुरवठ्याचे नियोजन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/11/2026 2:50 PM

📢 नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

दिवाळी सणानिमित्त उद्या शनिवारी सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन!

प्रभाग क्रमांक १८ मधील हनुमान नगर, भक्ती नगर, लक्ष्मीनारायण कॉलनी, आप्पासाहेब पाटील नगर, अण्णासाहेब पाटील नगर, जगदाळे प्लॉट, विठ्ठल नगर, मोहिते मळा, बन्ने फार्म हाऊस परिसर, आनंद शांती पार्क, आनंद कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, पोळमळा, महावीर पार्क, काबाज प्लॉट व लगतच्या परिसरातील नागरिकांना कळविण्यात येते की,

आज शुक्रवारच्या नियोजित पाणीकपातीमुळे काही भागांत पाणीपुरवठा झाला नाही. या दरम्यान मला प्रभागातून रत्नाकर नांगरे संभाजी पोळ संजय हेब्बाळकर तानाजी मोहिते अशा अन्य नागरिक बंधू-भगिनींचा पाण्याबाबत विनंती वजा फोन आला त्यानुसार या सर्वांना सोबत घेऊन  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी चर्चा करण्यात आली आहे.

त्यानुसार उद्या शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी व संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हा बदल केवळ उद्यापुरता असून, त्यानंतर पाणीपुरवठा पूर्वीच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहील.

काही भागांत पाण्याचा दाब कमी होणे किंवा तांत्रिक अडचणींमुळे पाणी न पोहोचणे अशा समस्या उद्भवल्यास कृपया संपर्क साधावा. संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल.

सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

आपला,
अभिजीत शकुंतला दत्तात्रय भोसले
नगरसेवक तथा सदस्य, स्थायी समिती
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका
प्रभाग क्रमांक १८
📞 ९३२६८ ९९९९१

Share

Other News

ताज्या बातम्या