गो पूजनात यशाच्या अमृत वर्षावाचा अनुभव: शेटे
नित्य नियमाने गो पूजन केल्यास सर्व पातळी वर वैयक्तिक यशाच्या अमृत वर्षावाची अनुभूती मिळते, त्यामुळे संकल्प करून नित्य नियमाने प्रत्येकाने गो पूजन करावे असे भावनिक आवाहन भारतीय जनता पक्षाचे भगूर देवळाली मंडळाचे सरचिटणीस आणि समर्पण प्रतिष्ठानचे कुटुंब प्रबोधन विभागाचे सह संयोजक श्री संदीप शेटे यांनी हिंदू जनतेला केले. वडनेर गेट जवळील गो शरणम् सानिध्य गो शाळेत समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वसुबारस निमित्य गो पूजन कार्यक्रमाच्या वेळी केले.
नित्य नियमित पणे गो ग्रास अर्पण करणे ही आपली संस्कृती आहे या अनादी अनंत युगा पासून परंपरागत संस्कृतीचे संस्कार भावी पिढीवर होण्यासाठी अश्या सामूहिक गो पूजनाच्या कार्यक्रमाची आज गरज निर्माण झाली आहे. आणि समर्पण प्रतिष्ठान आणि गो शाळेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आल्यामुळे जीवनाच्या सफलतेचा मार्ग विशाल झाला आहे असे प्रतिपादन त्यांनी या वेळी प्रमुख वक्ते म्हणून केले.
गो शाळेत येऊन सेवाभावी वृत्तीने गो सेवा केली तर गो मातेचा आशीर्वाद मिळणारच, आशीर्वाद द्यायला गो माता कधीही थांबत नाही पण आपण सर्वांनी तरुण पिढीला घेऊन गो शाळेत यायला हवे असे प्रतिपादन समर्पण प्रतिष्ठानच्या कुटुंब प्रबोधचे संयोजक प्रा डॉ मृत्युंजय कापसे यांनी या प्रसंगी केले.
धावपळीच्या जीवन शैली मुळे बऱ्याच वेळा गो ग्रास देणे शक्य होत नाही पण आपल्या घरात रोज नित्य नियमाने संकल्पित गो धन अमृत गंगाजळी जमवून महिन्यातून ती गो शाळेत दान केल्यास राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याच्या अनुभवा बरोबर गो सेवेचे पुण्य लाभेल असे प्रतिपादन समर्पण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ मानसी वाळिंबे यांनी केले.
समर्पण प्रतिष्ठानच्या कुटुंब प्रबोधचे सहसंयोजक श्री विशाल शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या वसुबारस गो पूजनाला ब्रम्हवृंदानच्या मंत्र घोषात गो पूजनाला प्रारंभ झाला. गो पूजना नंतर भव्य दीपोत्सवाचा तेजोमय आविष्कार उपस्थितांना एक वेगळी अनुभूती देऊन गेला.या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने गो शाळेला गंगाजळीचा धनादेश समर्पित केला गेला.
या कार्यक्रमाला गौ शरणम् सानिध्य गो शाळेच्या संचालिका सौ कल्याणी पोरजे,गो शाळेचे संचालक श्री अक्षय गोमासे, श्री विलास पोरजे, गो रक्षक श्री रमेश मानकर, श्री मंगेश वाळिंबे, सौ टिपरे ताई, सौ शिल्पा लोणारी, श्री जयदीप पांढरकर याच बरोबर परिसरातील नागरिक उपस्थित होते. गो मातेच्या जय घोषात कार्यक्रमाची सांगता झाली.