१७ वर्षाखालील कोल्हापूर विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत देशभक्त आर. पी. पाटील विद्यालय कुपवाडचा प्रथम क्रमांक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/10/2026 10:42 PM

 मंगळवार दि. 27/10/2026 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व कृष्णा व्हॅली क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागीय 17 वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धा पार पडल्या.
  या स्पर्धेमध्ये *देशभक्त आर.पी.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाडच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला* या संघाची *जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.*
ऊपांत्य सामन्यात सातारा जिल्हा संघाचा 39 धावांनी दणदणीत पराभव करून विद्यालयाच्या संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
 अंतिम सामना कोल्हापूर मनपा संघाबरोबर झाला. या अटीतटीच्या सामन्यात  गोलंदाजी फलंदाजी वक्षेत्ररक्षणामध्ये अतिशय नेत्रदीपक कामगिरी करत 4 धावांनी विजय मिळवून *देशभक्त आर.पी.पाटील विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत  राज्य स्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला.*
    खोखो,शूटिंगबॉल या खेळा बरोबरच क्रिकेट सारख्या खेळामध्ये नामवंत संघाचा पराभव करून प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये शाळेच्या संघाने प्रवेश मिळविलेला आहे.
या संघातील खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. अभय कर्नाळे हे गेली 2 वर्षे मार्गदर्शन करत आहेत.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस. पी.चव्हाण, पर्यवेक्षक श्री.बा.ग.सपकाळ यांचे प्रोत्साहन मिळाले.
  तसेच संस्थेचे चेअरमन सौ.सरोज रायनाडे मॅडम, सचिव प्रा.एस.ए.पाटील सर यांची खंबीर साथ मिळाली.

Share

Other News

ताज्या बातम्या