कुपवाड: मालगाव येथे झालेल्या पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुपवाड मधील राणाप्रताप मंडळाच्या महिला संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत राणाप्रताप महिला संघाने चांगला खेळ करत प्रतिस्पर्धी संघांना आव्हान दिले. खेळाडूंनी दाखवलेली चपळता, उत्कृष्ट समन्वय यांमुळे संघाला तृतीय क्रमांक मिळवण्यात यश आले. या स्पर्धेत कु.साक्षी पाटील, दीक्षा पाटील ,शुभांगी बंडगर ,धनश्री बंडगर ,अंजली वाघे ,संचित नरदेकर , वैष्णवी आगलावे ,आराध्य पाटील, रोहिणी बिरादार, सानवी कुंभार, नंदिनी चव्हाण, वंशिका जमदाडे, आर्या थोरात, अनुष्का वडर ,दिव्याभारती खांडेकर , इकरा ढगे.या खेळाडूचा सहभाग होता.तर संघ व्यवस्थापक म्हणून कु.प्रगती कर्नाळे यांनी काम पाहिले.स्पर्धेचे बक्षीस वितरण खो-खो संघटनेचे सचिव डॉक्टर प्रशांत इनामदार. उपाध्यक्ष डॉ. अमित रावटे,खजिनदार संजय हिरेकुर्ब यांच्या उपस्थितीत व समितीचे सदस्य प्रदीप सावंत पंचायत समिती माजी सदस्य काकासाहेब जामने,संजय बरगाले, नेमिनाथ शेडबाळे व संयोजक बाळासाहेब हुळे यांच्या हस्ते झाले.
या यशाबद्दल राणाप्रताप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, प्रशिक्षकांनी आणि क्रीडाप्रेमींनी महिला संघाचे अभिनंदन केले.
राणाप्रताप महिला संघाला
मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील,अजित पाटील,रमेश पाटील,प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा.सचिन चव्हाण, विशाल बन्ने, शिवसागर पाटील, महेंद्र पाटील,प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,सागर नरदेकर, महेश कर्नाळे,अतुल पाटील, अनिल पाटील, शेखर स्वामी, राहुल गवळी,धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे,शितल कर्नाळे,अक्षय पाटील, धनंजय पाटील, तक्षक गौडाजे,सुनिल सुतार, अभिषेक कर्नाळे,निलेश पवार, अमोल पाटील, अभिजीत सुतार, शुभम पाटील, दिपक पाडळे,स्वप्नील पाटील, अनिल हिरेकुर्ब, पोपट नरदेकर,वासुदेव जमदाडे आंदिचे मार्गदर्शन मिळाले.