अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मुख्य शिष्टमंडळ. सेक्रेटरी अमोल भागवत सह.नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल; दुष्काळग्रस्त जनतेच्या समस्यांबाबत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ​नाशिक:

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 28/10/2026 7:48 AM

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मुख्य शिष्टमंडळ सेक्रेटरी अमोल भागवत यांच्यासह.नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल; दुष्काळग्रस्त जनतेच्या समस्यांबाबत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
​नाशिक:
महाराष्ट्रात ठिकठिकाणी पडलेले दुष्काळाचे गडद सावट, त्यावर राज्य सरकारकडून होणाऱ्या केवळ घोषणा आणि विविध जिल्हा प्रशासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणीतील ढिसाळपणा याविरोधात गोरगरीब व सर्वसामान्य जनतेकडून आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या मुख्य शिष्टमंडळाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत प्रशासनाला धारेवर धरले.
​हे आंदोलन व शिष्टमंडळ समितीचे जनरल सेक्रेटरी अमोलभाऊ भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष शर्मा कार्यालयात उपस्थित नसल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे सविस्तर चर्चासत्र पार पडले.
​चर्चेदरम्यान अमोलभाऊ भागवत, नाशिक जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ मंडलिक आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मच्छिंद्रभाऊ मगर यांच्यासह समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी जनतेकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे प्रशासनाचा गाफिलपणा मुद्देसूदपणे मांडला. समितीची सर्वसामान्य जनतेविषयीची तळमळ आणि प्रामाणिक भावना पाहून अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी समितीच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
​मुख्यमंत्र्यांसोबत विशेष बैठकीची मागणी
चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाशभाऊ वाघ, जनसेविका दिपालीताई वाणी, जनसेविका मनीषाताई भुजबळ व जनसेविका अंजलीताई जाधव यांनी प्रशासनाला आग्रही विनंती केली. समितीने सादर केलेला अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव आणि दुष्काळासाठीचे स्वतंत्र नियोजन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तात्काळ पोहोचवावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतील जनतेच्या गंभीर अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करावी, ज्यामध्ये दुष्काळाचा संपूर्ण आढावा सादर केला जाईल, असे प्रतिपादन करण्यात आले. यानंतर समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली.
​प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या प्रसंगी महिला प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ, उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, जनसेविका आशाताई भोईर, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाशभाऊ वाघ, उपाध्यक्ष ज्योतीताई परदेशी, जनसेविका दिपालीताई वाणी, दिव्यांग अध्यक्ष सुरदास पावसे, जनसेविका मनीषाताई भुजबळ, जनसेविका अंजलीताई जाधव, जिल्हा सचिव सुनीताताई गांगुर्डे व तालुकाध्यक्ष सविताताई आहेर यांची विशेष सहभाग नोंदवला.
​तसेच उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, तालुकाध्यक्ष राहुल मोरे, श्यामआप्पा डावरे, मनीषाताई पंचाक्षरी, जगनभाऊ पवार, वाघमारे संजय, नाना बलकवडे, बिस्मिल्ला खान, राजूभाऊ मांडे आणि राजाभाऊ सिरसाट यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या