कुपवाडच्या रामकृष्णनगरमध्ये वीज ग्राहक महिलेची तक्रार; स्मार्ट मीटर कृती समिती शेवट पर्यंत पाठपुरावा करणार.
सांगली : कुपवाड येथील रामकृष्णनगर परिसरातील वीज ग्राहक मनीषा संतोष कारंडे यांच्या घरी कोणीही नसताना तसेच घराच्या फाटकाला कुलूप असताना, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गेटवरून प्रवेश करून स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कारंडे यांनी स्मार्ट मीटर कृती समितीकडे लेखी तक्रार तसेच संबंधित पुरावे सादर केले आहेत.
या प्रकरणी स्मार्ट मीटर कृती समितीने तक्रारदार मनीषा कारंडे यांना सोबत घेऊन सांगली जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक मा. बारवकर मॅडम यांची भेट घेतली. सदर प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने पाठपुरावा केला आहे.
वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय अथवा त्यांच्या अनुपस्थितीत मीटर बसविण्याच्या प्रकाराबाबत संबंधित यंत्रणेने चौकशी करून वस्तुस्थिती नुसार कायदेशीर कारवाई झाली पाहिजे , अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी स्मार्ट मीटर कृती समितीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण, डॉ. मन्नान भाई शेख, नईम भाई शेख, रामदास सावंत, प्रमोद इनामदार सरकार, पै. रणजीत चव्हाण, विजय बल्लारी, महेश मासाळ, युवराज मोने, प्रतीक पाटील, अबू मुसा सय्यद, हुसेनभाई शेख तसेच तक्रारदार मनीषा संतोष कारंडे आदी उपस्थित होते.
सदर घटनेबाबत समिती व तक्रारदारांनी केलेल्या आरोपांची अधिकृत चौकशी होणे अपेक्षित असून, त्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल.