मुख्य संपादक : रवीकुमार शिंद
आपलं सत्य अहिल्यानगर
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
हिंदी मराठी पत्रकार संघ तालुका संघटक
अकोले | प्रतिनिधी
अकोले येथील पंकज लॉन्स येथे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अकोले तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पशुधनासाठी चारा-पाणी व्यवस्था तसेच शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
टंचाईच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि संवेदनशीलतेने काम करावे. आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीदरम्यान तालुक्यातील पाणीपुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण, वीजपुरवठा आणि जलसंपदा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य तसेच पशुधनासाठी आवश्यक चारा-पाण्याची व्यवस्था याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी शैलेश हिंगे (अतिरिक्त जिल्हाधिकारी, शिर्डी), विजय मुळीक (उपमुख्य कार्यकारी अधिकारी), सुधाकर बोराळे (जिल्हा कृषी अधीक्षक), उमेश पाटील (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी), रमेश पवार (अधीक्षक अभियंता, महावितरण), सुनंदा नरवडे (अधीक्षक अभियंता, जीवन प्राधिकरण), गायसमुद्रे पांडुरंग (जिल्हा जलसंधारण अधिकारी), अरुण उंडे (उपविभागीय अधिकारी), जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कवडे, तसेच प्रदीप हापसे, स्वप्निल काळे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने आणि कृषी अधिकारी अतुल पवार उपस्थित होते.
याशिवाय आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टंचाईच्या काळात प्रशासनाने केवळ आढावा न घेता प्रत्यक्ष उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
#अकोले #अहिल्यानगर #टंचाई #दुष्काळ #पाणीटंचाई #राधाकृष्णविखेपाटील #शेतकरी #पिण्याचेपाणी #आपलंसत्यअहिल्यानगर #Akole #Ahilyanagar