प्रभागातील समस्या ऐरणीवर; त्वरित दुरुस्तीची मागणी: नगरसेविका सौ. सोनालीताई सोनवणे
भगूर (विशेष प्रतिनिधी):
प्रभाग क्रमांक १० मधील नाल्यावरील जाळी काल तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्यात आली होती. मात्र, रात्री पुन्हा ती जाळी तुटल्याने स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत, नगरपालिका मुख्याधिकारी साहेबांनी तातडीने हस्तक्षेप करावा. तसेच पालिका अभियंत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मजबूत व चांगल्या दर्जाची जाळी बसवून द्यावी, जेणेकरून कोणताही अपघात घडणार नाही आणि नागरिकांची गैरसोय टळेल, अशी कळकळीची विनंती प्रभाग क्र. १० च्या नगरसेविका सौ. सोनाली विक्रम सोनवणे यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे, नगरपालिका अभियंता साहेबांनी स्वतः या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कारवाई तातडीने करावी, अशी ठाम मागणीही नगरसेविका सौ. सोनाली सोनवणे (भगूर नगरपरिषद) यांनी प्रशासनाकडे केली आहे.