नांदेड : सामाजिक बांधिलकी जपत डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाचा वाढदिवस समाजसेवेला समर्पित करण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत दि. २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी विविध आरोग्य सेवा, शासकीय योजना व नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्रांशी संबंधित सेवा देणाऱ्या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ५०० नागरिकांनी विविध सेवांचा लाभ घेतला.
सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड, भारतीय जनता पार्टी तृतीयपंथी प्रकोष्ठ तसेच विविध सहकारी संस्था व मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या सहकार्याने भव्य रक्त तपासणी शिबिराचे सेवाभावी व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या सेवा संकल्प अभियानाचे उद्घाटन नांदेड भारतीय जनता पार्टी महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे डॉ. सचिन उमरेकर, नगरसेवक प्रतिनिधी सतीश बसवते, शीतल खांडील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध राजकीय, प्रशासकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. सान्वी जेठवाणी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या अभियानात नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये—
मोफत रक्त तपासणी शिबिर – १४१ नागरिकांची तपासणी
मोफत नेत्र तपासणी शिबिर – १०० नागरिकांची तपासणी
कान तपासणी शिबिर – ५० नागरिकांनी लाभ घेतला
· आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावत करण्याची सुविधा – ४० नागरिकांनी लाभ घेतला
· मतदार यादीत नाव तपासणी व नाव नोंदणीसाठी मार्गदर्शन
· मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी सुविधा
· आयुष्मान भारत कार्ड – जवळपास ५० नागरिकांनी लाभ घेतला
· रेशन कार्डसंदर्भातील सेवा – १५ नागरिकांनी लाभ घेतला
· ज्येष्ठ नागरिक कार्ड – ५ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला
तसेच नागरिकांना विविध शासकीय योजना व उपलब्ध कल्याणकारी योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यात आले. या सर्व सेवांमुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची गरज न पडता आवश्यक माहिती व सुविधा एकाच ठिकाणी मिळाली. ‘सेवा संकल्प अभियान’ केवळ शिबिरांपुरते मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत अनाथालयात अन्नदान करण्यात आले. तसेच मुलींच्या निवासी वसतिगृहात सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. यामुळे सामाजिक सेवा, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.
नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करत असताना, अशा परिस्थितीत वाढदिवसाचा खर्च उत्सवावर न करता समाजाच्या उपयोगासाठी आणि गरजू नागरिकांच्या सेवेसाठी खर्च करण्याचा संकल्प डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केला. नागरिकांना आवश्यक असलेल्या आरोग्य सेवा, शासकीय योजना व कागदपत्रांच्या सुविधांचा लाभ मिळवून देणे, हा या अभियानामागील मुख्य उद्देश होता.
या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल डॉ. सान्वी जेठवाणी यांनी सर्व नांदेडकरांचे आभार मानले. “नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हीच आमच्यासाठी खरी वाढदिवसाची भेट आहे. भविष्यात यापेक्षाही मोठ्या स्वरूपात सेवा शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत विविध सेवा पोहोचविण्याचा मानस आहे,” असे त्यांनी सांगितले.
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून वाढदिवसाला सामाजिक सेवेचे स्वरूप दिल्याबद्दल डॉ. सान्वी जेठवाणी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
सदर ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करण्यासाठी विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते नागरिकांना विविध सेवांचा लाभ मिळवून देण्यापर्यंत सर्वांनी मनापासून परिश्रम घेतले.
यामध्ये दायम कुरेशी, लख्खन वापराणी, हरीश काले सुनील शेट्टे, मैफूज, नईम खान, यश वाठोरे, अक्षय नरवाडे, रागेश्री जोशी, ज्योती पाटील आणि देवयानी जोशी आदि यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या समर्पित सहकार्यामुळे दोन दिवसीय सेवा संकल्प अभियान सुरळीतपणे पार पडले. आयोजकांच्या वतीने सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.