नांदेड : धर्माबाद तालुक्यातील सालेगाव येथे जलसंधारण विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी जलसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शेताच्या बांधावर वृक्षारोपण केले.
कार्यक्रमास जलसंधारण विभागासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नाला खोलीकरणाच्या कामामुळे पावसाच्या पाण्याचे अधिक प्रभावी साठवण, भूजल पातळीत वाढ आणि परिसरातील शेतीला दीर्घकालीन लाभ होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.