4 किलो 69 ग्रॅम गांजा, मोटार सायकल व 2 मोबाईल असा एकूण 2,01,725/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 31/05/2026 1:30 PM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा दी:स्थानिक गुन्हे शाखा सातारा व फलटण शहर पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई
4 किलो 69 ग्रॅम गांजा, मोटार सायकल व 2 मोबाईल असा एकूण 2,01,725/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्य ा इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार पो.नि. विश्वजीत घोडके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पो.उ.नि. परितोष दातीर यांचे पथक तयार करून सातारा जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांविरुद्ध गोपनीय बातमी प्राप्त करून छापा कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक 29/05/2026 रोजी कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी फलटण येथे नेमली असताना पो. उ.नि. परितोष दातीर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, दोन इसम हे बजाज प्लॅटिना मोटार सायकल क्र. MH 12 HX 2649 वरून रावरामोशी पुलाजवळ कॉर्नरला मौजे धुळदेव ता. फलटण गावचे हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि. विश्वजीत घोडके यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पो. उ.नि. परितोष दातीर, पोलीस अंमलदार अमोल माने, जयवंत खांडके, अजय जाधव पविण पवार, संकेत निकम, 
, विजय निकम यांचे पथक तयार करून सदर पथकास स्थानिक फलटण शहर पोलीस ठाणेकडील अधिकारी पो.नि. अरविंद काळे, स.पो.नि. मिठू जगदाळे व त्यांचेकडील पोलीस अंमलदार यांची मदत घेऊन संयुक्तपण े छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक व फलटण शहर पोलीस ठाणेकडील पथक यांनी संयुक्तपणे मिळाले बातमीचे ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली असता त्या ठिकाणी दोन संशयित इसम मिळून आले. त्यांचेकडे असणारे पिशवीमध्ये 4 किलो 69 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला असून तो गुन्ह्याचे पुढील तपासकामी जप्त करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई मध्ये श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. अरविंद काळे, स.पो.नि. श्री मिठू जगदाळे, नितीन शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडील पो. उ.नि. विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार मंगेश महाडिक, अमोल माने, अजय जाधव, जयवंत खांडके, अमित झेंडे, नवनाथ कदम, अजित कर्णे, अमित सपकाळ, ओंकार यादव, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक, प्रविण पवार, संकेत निकम, विजय निकम, आनंदा भोये तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार रुक्मिणी माने, बापूराव धायगुडे, निखिल गायकवाड, गणेश आवघडे, अतुल बडे यांनी कारवाईत सहभाग घेतला असून सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या