पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/04/2026 8:32 PM

नांदेड :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे 17 व 18 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वा. छत्रपती संभाजीनगर येथून माहूरगड शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह माहूरगड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. परमपुज्य महंत दत्त शिखर संस्थान माहूरगड यांची भेट व दर्शन. सकाळी 10.30 वा. रेणुकादेवी माता दर्शन व परिसरातील विकास कामांची पाहणी. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूरगड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. माहूर विकास आराखडा सादरीकरण आणि जिल्हाधिकारी व इतर संबंधित यांच्यासोबत बैठक. स्थळ-तहसिल कार्यालय माहूरगड. दुपारी 1 वा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किनवट आणि इतर संबंधित यांच्यासोबत आदिवासी उपयोजना आणि इतर विषयी संबंधीत बैठक. स्थळ तहसिल कार्यालय माहूरगड. दुपारी 2 वा. भोजन व राखीव. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव व मुक्काम.

शनिवार 18 एप्रिल 2026 सकाळी 9 वा. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे नियोजित ओबीसी स्वयंरोजगार मेळावा 2026 निमित्त पाहणी. सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विविध प्रशासकीय बैठका. नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भाने प्रशासकीय अधिकारी यांची आढावा बैठक. बळीराजा शेती पाणंद रस्ते योजना आढावा बैठक. जिल्हा परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग इत्यादींची आढावा बैठक. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील. 

Share

Other News

ताज्या बातम्या