" राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व प्रमुख मोहन भागवत यांचा निषेध "

  • Nitin Ganorkar (Paratwada)
  • Upadted: 19/09/2024 9:37 PM

परतवाडा जि.अमरावती : प्रतिगामी संघटनांकडून शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय जाणीवपूर्वक लोकमान्य टिळक यांना दिलं जाते. तथापी त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध असतांना, १८६९ साली जोतिराव फुलेंनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. १८८० साली जोतीराव फुले पुण्यातून चालत रायगडावर गेले.तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने सहकाऱ्यांसह शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची मिळालेली नोंदही उपलब्ध आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिव जयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. इतका स्पष्ट इतिहास असतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी टिळकांनीच रायगडावर शिव समाधी व सर्व शोधले असा खोटा इतिहास सांगून अपप्रचार करून महात्मा जोतिराव फुलेंचा व त्यांना मानणाऱ्या लोकांचा अपमान करून भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व प्रमुख मोहन भागवत यांचा निषेध नोंदवत आहोत, त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही प्रशासनाने करावी अशी मागणी  सावित्री शक्तीपीठ, पुणे महाराष्ट्र अंतर्गत परतवाडा येथील राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ.शीला चर्जन, राज्याध्यक्षा सौ.अपूर्वा सोनार, तालुकाध्यक्षा सौ.अनुराधा भुस्कट ,वर्षा भुयार,  चित्रा रसे, साहित्यिक जयकुमार चर्जन, लेखक प्रा. श्रीकृष्ण बनसोड ( अमरावती ),राजश्री आमले,अरुण गणोरकर, दै. सकाळ तालुका प्रतिनिधी प्रकाश गुळसुंदरे, श्री. व्यवहारे सह फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

" सावित्री शक्तीपीठ अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व प्रमुख मोहन भागवत यांचा निषेध " 

Share

Other News

ताज्या बातम्या