धन्यवाद, सांगली पोलीस....

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/09/2024 11:32 AM

आपल्या सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी पोलीस बांधव यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व आभार...
एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होत असताना चोक  बंदोबस्त करून नियोजनबद्ध उत्सव शांततेत पार पाडले.
तसेच नेमके काय काय काम पोलिसांनी करायचे आहे हेच कळत नाही कायदा सुव्यवस्था अबाधित राखायची का चोरी दरोडे याबाबत पाठपुरा करून शोध काम करायचे महापूर आला पोलीस बंदोबस्त लावा वाहतूक खोळबा झाली पोलीस बंदोबस्त लावा नेत्यांचे दौरे आहेत पोलीस बंदोबस्त लावा नेत्यांना सुरक्षा द्या पोलीस बंदोबस्त लावा आंदोलने आहेत पोलीस बंदोबस्त लावा प्रत्येक नेत्यांना बॉडीगार्ड पुरवा पोलीस नेमा दंगल झाली पोलिसांना बोलवा, दिवाळी दसरा ईद ख्रिसमस गणपती नवरात्री शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, व अन्य जयंती व उत्सव किती किती ठिकाणी कशा कशा पद्धतीने जबाबदारी पार पाडायसाठी पोलिसांची गरज लागते या बाबतीत विचार विनिमय झालाच पाहिजे.
 पोलिसांची संख्या किती आहे त्यात त्यांनी काय काय काम करायचे आहेत याची व्याख्या व कामाची पद्धत काही तर ठरलेली आहे का? ठीक आहे काही ठिकाणी चुका होत असतीलही त्यावर समाज माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून टीका टिपणी होत असते मात्र पोलीस याची व्याख्या त्यांची कर्तव्य याचा प्राधान्यक्रम ठरला पाहिजे मग त्यांना त्यांच्या कामाचा जाब विचारणे संयुक्त ठरेल असे वाटते 
या बाबतीत आमचे अज्ञान असेल ही त्यात दुरुस्त करावे अशी विनंती आहे

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या