मा. मुख्यमंत्री आणी त्यांचे सहकारी शक्तिपीठ महामार्गाबाबत उलट सुलट विधाने करीत असताना रस्ते विकास महामंडळाने मा. राजु शेट्टी यांना जुन महिन्यात पत्र लिहून या महामार्गाबाबत सर्व माहीती कळवली आहे. आणी त्यात जमिनीचे मुल्यांकन करताना रेडीरेकनरच्या पाचपट करण्यात येईल. असेही पत्रात म्हंटले आहे. आणी ते पत्र आज प्रसिद्ध केले आहे. रस्ते विकास महामंडळाने जुन्या कडीस का उत आणला आहे.
पाठीमागील महीन्यात रस्तेविकास महामंडळाने शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस केल्याची बातमी होती. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नेमक कोण फसवतय रस्ते विकास महामंडळ? महाराष्ट्र सरकार, की बातम्या पेरणारे?
कोल्हापूर मध्ये मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महामार्ग रद्द झाल्याची घोषणा केली, तर दोन दिवसापूर्वी शक्तिपीठला फक्त नांदेड आणी कोल्हापूरचा विरोध आहे. असे जाहीरपणे बोलले तर रस्ते विकास महामंडळ म्हणते शेतकऱ्यांना पाचपट रक्कम देवुन महामार्ग करणार आहोत. असे म्हणते, मग नेमक खर काय आहे? शक्तिपीठ महामार्ग रद्द करणार की महामार्ग करणार? याबाबतची उलट सुलट विधाने थांबवावीत. नेमक काय करणार? हे जाहीर करण्याची मागणी आम्ही करीत आहोत. दरम्यान २५ सप्टेंबर रोजी सरकारचा महाळ घालुन १००० लोकांना जेवण घालण्यात येणार आहे, आणी ४ ऑक्टोबर रोजी मा. ना. नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून निषे:ध करणे. हे दोन्ही कार्यक्रम जोरदारपणे करण्यात येणार आहेत.
*उमेश देशमुख,सतिश* *साखळकर ,प्रभाकर* *तोडकर,सुनिल पवार,उमेश एडके,पैलवान विष्णू* *पाटिल,अभिजीत जगताप,प्रविण* *पाटिल,श्रीकांत पाटिल,यशवंत* *हरुगडे, सुधाकर पाटिल, विलास* *थोरात, राजेश पाटिल, विलास* *पाटिल,धनाजी* *पाटिल.*