महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या हजारो मोकाट कुत्र्यांचा बिनधास्तपणे वावर वाढला असून ही मोकाट कुत्री अनेक वेळा नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक बनत आहेत . संजय नगर मधील एका चिमूरड्या मुलीवर अशाच मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच काल माळी गल्लीतही एका दिड वर्षाच्या बालकावर या कुत्र्यांनी हल्ला केला आहे .याआधी अशाच प्रकारे मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याचे अनेक प्रकार महानगरपालिका क्षेत्रामध्ये घडले असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे .याआधीही लोकहित मंचच्या वतीने अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे अशी मागणी केली असतानाही त्यावर ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही.
महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाहिले असता आज प्रत्येक रस्त्यावर कुत्र्यांचा कळप पाहायला मिळत आहेतच.शिवाय महापालिका इमारतीमध्येही अगदी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखालीच ही कुत्री मुक्कामाला असल्याचे दिसून येत आहे .
यावर पोस्ट उपाययोजना म्हणून महानगरपालिकेची डॉग व्हॅन सर्वत्र फिरवून मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे .महानगरपालिका क्षेत्र आणि त्यामधील कुत्र्यांची वाढलेली संख्या पाहता डॉग व्हॅनची संख्या सुद्धा वाढवावी,महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध करून द्यावी .अन्यथा लोकहित मंचच्या वतीने ही मोकाट कुत्री महानगरपालिका कार्यालयासह आरोग्य अधिकार्यांच्या निवासस्थानी सोडण्याचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज दिला आहे.