नांदेड :- वारकरी संप्रदायाची परंपरा,संत साहित्याचा प्रचार-प्रसार आणि भक्तीभावनेचा जागर करण्याच्या उद्देशाने वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचा १५ वा वर्धापन दिन दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड शहर व जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायण सांगता सोहळा, पालखी मिरवणूक,महिला जणाई- मुक्ताई-बहिणाबाई हरिपाठ, भजनी मंडळांच्या स्पर्धा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी साहित्य परिषदेचे कार्य देशभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये आणि ३६० तालुक्यांमध्ये विस्तारले असून, वारकरी संप्रदायाची परंपरा, संत साहित्याचे विचार आणि आध्यात्मिक संस्कार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य परिषदेमार्फत सातत्याने सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे संघटन, संत विचारांचा प्रसार आणि धार्मिक-सामाजिक प्रबोधनाला चालना मिळत आहे.
सकाळी ८ ते १० या वेळेत सामूहिक जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पालखी मिरवणूक, दुपारी १२ ते १ या वेळेत प्रवचन,पसायदान आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्याला वारकरी, भाविक, महिला भजनी मंडळे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमास राजेश्वरी गगनराज पाटील, महिला संस्थापक अध्यक्ष, ह.भ.प. बाळगीर महाराज, मठ संस्थान धनेगाव, ह.भ.प. नारायण महाराज समदुरे (नांदेड), ह.भ.प. हरिहर महाराज मरळकर, ह.भ.प. रामेश्वर महाराज गोडसे (बारड), ह.भ.प. परमेश्वर महाराज भोकरकर, ह.भ.प. कोंडीबाराव मोरे गुरुजी (टिळकेकर), महासचिव, ह.भ.प. बंडू महाराज काटकर, उपाध्यक्ष नांदेड जिल्हा, ह.भ.प. बाबुराव पाटील शिवनीकर, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष, ह.भ.प. प्रकाश महाराज कल्याणी (कामारीकर), ह.भ.प. उद्धव महाराज ठोके, नांदेड जिल्हा, नांदेड तालुका अध्यक्ष, ह.भ.प. डॉ.मांडेकर, ह.भ.प. रेखाताई पाटील, लोहा तालुका अध्यक्ष, ह.भ.प.गणेश महाराज गादेवार, नांदेड जिल्हा संघटक, ह.भ.प. धनंजय महाराज जाधव, नांदेड जिल्हा अध्यक्ष, ह.भ.प.वैष्णवीताई सुनील गवळी, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष, ह.भ.प. दत्ता महाराज वडशिंगे, नांदेड जिल्हा मार्गदर्शक, ह.भ.प. अंजलीताई मोतेवार, नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष, ह.भ.प. जिजाबाई देशमुख, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, ह.भ.प. प्रदीप महाराज हंबर्डे, नांदेड तालुका उपाध्यक्ष, ह.भ.प. तातेराव पाटील आसरजनकर, नांदेड जिल्हा सल्लागार तसेच ह.भ.प. एन.टी. सर बरबडेकर यांची उपस्थिती होती.
या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिला भजनी मंडळांच्या भक्तिमय सादरीकरणाला विशेष प्रोत्साहन देण्यात आले. जनाई, मुक्ताई व बहिणाबाई महिला भजनी मंडळांचा पारितोषिक वितरण करून गौरव करण्यात आला. यावेळी माऊली भजनी मंडळ, दत्तनगर नांदेड यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीकृष्ण भजनी मंडळ, विष्णुपुरी यांनाही सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
तसेच शिवाहर भजनी मंडळ, ओंकारेश्वर नगर, शिवनगर नांदेड, शिवपार्वती भजनी मंडळ, सोनखेड, जय श्रीराम भजनी मंडळ,धनेगाव,जनाई मुक्ताई भजनी मंडळ,ब्रह्मपुरी नांदेड आणि नगरेश्वर भजनी मंडळ,नांदेड यांचा पारितोषिक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.संत साहित्याचा विचार समाजापर्यंत पोहोचविणे,वारकरी संप्रदायाची परंपरा जतन करणे, महिला भजनी मंडळांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नव्या पिढीमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
गाथा पारायण,पालखी मिरवणूक, हरिपाठ,प्रवचन,पसायदान आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. वारकरी साहित्य परिषदेच्या १५ व्या वर्धापन दिनाचा हा सोहळा संत विचारांचा जागर आणि वारकरी परंपरेच्या संवर्धनाचा प्रेरणादायी उत्सव ठरला.संतचरणरज धनंजय महाराज जाधव नांदेड जिल्हाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद सर्व नांदेड जिल्हा कार्याकारणी यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.