देवदान संस्थेचे कार्य कौतुकास्पद, संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पृथ्वीराज बाबा पाटील यांचे गौरवोदगार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/11/2026 2:17 AM


कुपवाड : येथील शासनमान्य देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचेकडून प्रतिवर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार व जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्काराचे वितरण कुपवाड येथील इनामदार मल्टीपर्पज हॉल येथे दिमाखात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा. पृथ्वीराज बाबा पाटील उपस्थित होते. कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार मनोज यादव साहेब होते. यावेळी प्रमुख उपस्थिती पंचायत समिती मिरज च्या सभापती सौ. राणी भोरे, कुपवाड मनपा च्या सभापती श्रीमती माया गडदे, माजी उपमहापौर मोहनबापू जाधव, आष्टाचे नगरसेवक सुहास अवघडे, स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव भोसले, परवेज मुलाणी, धोंडीनाथ कोष्टी, भारत वडगावकर, जयश्रीताई पाटील, संस्थेचे संस्थापक अनिल मोहिते, सेक्रेटरी अजिंक्य मोहिते आदीच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी पृथ्वीराज बाबा पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
जीवन गौरव: नारायण जाधव (तासगाव), प्रशासकीय शिक्षक सेवा: विजयकुमार गदगडे (सांगली), सावित्रीबाई फुले प्रशासकीय सेवा : कु. पूजा पाटील (विटा), आदर्श प्राचार्य :डॉ. मनोजकुमार दळवी (फलटण), सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका : डॉ. संगिता भिसे (लातूर), आदर्श शिक्षक रत्न : प्रकाश कलादगी (म्हैशाळ), डॉ. बाजीराव माने (आष्टा), डॉ. विवेक जाधव (लातूर), डॉ. चेतन डोंगरसाने (वाठार), डॉ. प्रविण थोरात (यड्राव), जितेंद्र चोपडे (मिरज), डॉ. वैभव मगदूम (इचलकरंजी), सुरज आव्हाड (रत्नागिरी), राहुल पोवार (वारणानगर), मयुरेश पटवर्धन (नाशिक), सौ. प्रियांका भुसारी (सांगली), विष्णू सावंत (सांगली), मल्लाप्पा पूजेरी (जत), क्रीडा शिक्षक : रुद्रेशाप्पा शिवपूलजी (आष्टा), विशेष शिक्षक : आशुतोष काटे (आटपाडी). शिक्षकेत्तर कर्मचारी : प्रशांत मुळीक (कवठेपीरान). आदी शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते गौरवले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. अमोलकुमार जाधव यांनी काम पाहिले.
समाजभूषण पुरस्कार: मोहन बापू जाधव (माजी उपमहापौर), सुहास औघडे (नगरसेवक), आकाश गोसावी (सामाजिक कार्यकर्ते), बाळासाहेब निकम (सामाजिक कार्यकर्ते), सतिश सनदी (सामाजिक कार्यकर्ते) यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच पी एच डी उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. सिद्धनाथ निशाणदार, डॉ. भरत घाडगे सरांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे नूतन सह सचिव पदी सौ. सुदेष्णा मोहिते, सह खजिनदार पदी आशुतोष मोहिते व स्वीकृत संचालक पदी डॉ. विशाल वाडकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी चे कुपवाड शहर सरचिटणीस सतिश मामा वाघमारे, संकल्प युवाशक्ती चे अध्यक्ष सागर भैया खंडागळे, प्रमोद कदम, बसाप्पा कोरती, प्रमोद आवळे, विजय पवार, अलिशा मोहिते, मिनाक्षी मोहिते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत सेक्रेटरी अजिंक्य मोहिते यांनी केले, प्रास्ताविक अध्यक्ष व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते अनिल मोहिते यांनी केले, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अलिशा मोहिते यांनी केले. पृथ्वीराज बाबा पाटील, मनोज यादव साहेब, डॉ. अमोल जाधव, गुलाबराव भोसले, भरत वडगावकर, मोहन बापू जाधव आदींची भाषणे झाली.

Share

Other News

ताज्या बातम्या