*पूर्वाचल विद्यार्थ्यांची भगूर स्वातंत्र्यवीर जन्मभूमी स्मारकास भेट*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 16/11/2026 11:54 PM

*पूर्वाचल विद्यार्थ्यांची भगूर स्वातंत्र्यवीर जन्मभूमी स्मारकास भेट*
पूर्वाचल म्हणजेच ईशान्य भारतातील आसाम,मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर,मिझोराम, सिक्कीम या आठ राज्यातील (अष्टलक्ष्मी )विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सहा ठिकाणी त्यात नाशिक, पुणे, डोंबिवली, ठाणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर इत्यादी शहरात इयत्ता 1ली ते 12 वी पर्यंत शिक्षण दिले जाते. त्या पूर्वाचलातील विद्यार्थ्यांचा चार दिवसांचा प्रशिक्षण वर्ग नाशिक येथे संपन्न झाला. त्यानंतर हे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी भगूर मधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमी स्मारकास भेट देण्यास दोनशे अडीचशे च्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भगूरच्या नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शब्दसुमंनांनी हार्दिक स्वागत करून सावरकर जन्मभूमीचे महत्व विषद केले, सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला व भगूर येथील सावरकरांच्या जन्मभूमी स्मारकास भेट देण्यास पुन्हा पुन्हा येण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथराव शेटे व रा. स्व. संघांचे खंडेराव खैरनार सरांनी सर्व विद्यार्थ्यांना सावरकरांच्या कार्याचा ओघावत्या भाषेत सविस्तर परिचय करून दिला, सावरकरांच्या देशाप्रती असलेल्या समर्पित जीवनाची माहिती दिली.
यावेळी भगूर चे उपनगराध्यक्ष प्रसाद अंबादास आडके, नगरसेविका सुजाता विशाल सिरसाठ, नगरसेवक प्रा. डॉ. मृत्युंजय कापसे, नगरसेवक विशाल बलकवडे, जनकल्याण समितीचे मदन भंदुरे, पूर्वाचल विकास समितीचे राहुल काळकर, प्रांताचे पदाधिकारी पाडेकर, लोणकर,भाजप नेते मधुकर कापसे, अशोक लोया, सुनील जाधव,शांताराम शेटे, युनूस शेख, राजेंद्र ओहोळ, संदीप शेटे, सचिन झुटे,जितेंद्र भावसार, अनिल कवडे, सावरकर स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे, आकाश नेहरे, मनोज कुवर, शेखर जोशी, निलेश हासे आदी भगूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या