देवळाली कॅन्टोन्मेंट वॉर्ड क्रमांक ८ मधील अर्धी कामे डिसेंबरअखेर मार्गी लागणार
उर्वरित कामे मार्च २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिपाठी यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
भगुर | वार्ताहर
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्र. ८ अंतर्गत येणाऱ्या विविध भागातील रस्ते, ड्रेनेज लाईन आणि अन्य विकासकामांबाबत यापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करण्यासाठी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिपाठी यांची पुन्हा एकदा भेट घेतली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिपाठी यांनी शिष्टमंडळाला ठोस आश्वासन दिले. “यापैकी अर्धी कामे आम्ही घेतली आहेत. ही कामे बोर्ड मीटिंगमध्ये पास करून घेतो. डिसेंबरपासून कामे चालू होतील. डिसेंबरअखेर अर्धी कामे मार्गी लागतील. बाकीची उर्वरित अर्धी कामे मार्च २०२७ मध्ये पूर्ण करू,” असे त्रिपाठी यांनी सांगितले.
या भागात अनेक वर्षांपासून रस्ते नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर प्रचंड चिखल व खड्डे पडत असल्याने नागरिकांचे हाल होतात. आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.
या परिसरातील प्रलंबित व गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठीच शिष्टमंडळाने यापूर्वी विविध विकासकामांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले होते. त्या निवेदनावर कार्यवाही व्हावी, यासाठीच सोमवारी पाठपुरावा भेट घेण्यात आली. सर्व समस्या प्रशासनाने तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने पुन्हा केली.
शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
*१)* उड्डाणपूल पासून ते श्री एकनाथराव शेटे सर यांच्या घरापर्यंत रस्ता बनवणे.
*२)* सैनिक सोसायटी जवळील मुंदडा फार्म ते श्री प्रविण शेळके यांच्या घरापर्यंत रस्ता बनवणे.
*३)* हेमांगी सोसायटीमधील सर्व रस्ते व उद्यानाची जागा डेव्हलप करणे.
*४)* श्री गजानन महाराज मंदिरामागील कॉलनीमधील दोन रस्ते बनविणे.
*५)* पारिजातक नगर मधील रस्ता बनविणे.
*६)* तिरुपती गार्डन, दत्तनगर, तिरुपती रो हाऊस, शिवराव सो., अर्क सो. येथे ड्रेनेज लाईन टाकणे व रस्ते बनविणे.
*७)* रेणुका नगर, नानेगाव रोड येथील रस्त्यांची कामे करणे.
*८)* गुस्ताद नर्सरी ते माळी मळारस्ता व स्ट्रीट लाईट लावणे.
*९)* 9. श्रीमंत रो हाऊस जवळील रस्ता व अंडरग्राऊंड ड्रेनेज टाकणे.
*१०)* हेमांगी सोसायटीमधील उद्यान डेव्हलप करणे.
*११)* पंचज्योती सोसायटी मधील रस्ता बनविणे.
*१२)* उड्डाणपुलापासून ते अर्क सोसायटी पर्यंत तसेच नानेगाव रोडवरील रस्त्यांची कामे करणे.
या सर्व प्रमुख नागरी समस्या असून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यापैकी अर्धी कामे डिसेंबरअखेर तर उर्वरित कामे मार्च २०२७ मध्ये होतील, असे आश्वासन मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर यांच्यासह उदय देशमुख, भूषण गायकवाड, मोहन खैरनार, दशरथ ठुबे, दिनकर जगताप, अरुण कस्तुरे, दिनेश शहाणे, प्रताप गायकवाड, सुनील उनवणे, संतोष शेळके, महेश राहाणे, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश चंद्रात्रे, नारायण इमानदार, राज येसू, मनीष ससाने, तानाजी गवारे, शिवाजी आव्हाड उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्यासोबत चर्चा करताना वृक्षमित्र तानाजी भोर, भूषण गायकवाड, उदय देशमुख यांच्यासह वॉर्ड क्रमांक ८ मधील समस्याग्रस्त नागरिक