प्रभाग क्रमांक २ मधील बजरंगनगर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रास सदिच्छा भेट!
आज प्रभाग क्रमांक २ मधील बजरंगनगर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रास भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली.
यावेळी केंद्रातील डॉक्टर डॉ. सुप्रिया कवठेकर, त्यांचा वैद्यकीय कर्मचारी वर्ग, आरोग्य सेविका व आशा वर्कर यांच्याशी संवाद साधला. केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच आवश्यक असणाऱ्या इतर सोयी-सुविधांची सविस्तर माहिती घेतली.
प्रभागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ व चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी दिले.