गोडसे परिवाराची माणुसकीची दिवाळी; सलग तिसऱ्या वर्षी घरोघरी मिष्ठान्न फराळाचे वाटप प्रेम, आपुलकी आणि सामाजिक एकोपा जपत मुदखेडमध्ये स्तुत्य उपक्रम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 14/11/2026 9:54 PM

नांदेड:- दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि माणुसकीचे नाते अधिक दृढ व्हावे, या उदात्त भावनेतून गोडसे परिवाराच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी मुदखेड शहरात घरोघरी दिवाळी मिष्ठान्न फराळाचे वाटप करण्यात आले. केवळ फराळ वाटपापुरता मर्यादित न राहता प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम शहरवासीयांसाठी माणुसकीची दिवाळी ठरला.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्या आनंदासोबतच इतरांच्याही आनंदात सहभागी होण्याची भावना जपणे महत्त्वाचे आहे. याच विचारातून माजी उपनगराध्यक्ष बालाजी गोडसे, काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास गोडसे आणि सुरेश गोडसे यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. सलग तीन वर्षांपासून कोणत्याही प्रसिद्धीचा किंवा दिखाव्याचा हेतू न ठेवता सातत्याने हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला आहे.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. या सणाचा गोडवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, या भावनेतून गोडसे परिवाराने घरोघरी जाऊन मिष्ठान्न फराळाचे वाटप केले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गोडसे परिवाराच्या सामाजिक जाणिवेचे आणि माणुसकीच्या भावनेचे कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, गोडसे परिवाराकडून केवळ दिवाळीपुरतेच सामाजिक कार्य मर्यादित नसून आरोग्य, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी जपत सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाशी आपुलकीचे नाते जोडण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या