देवळालीत संत राजिंदर सिंग जी महाराज यांच्या ८० व्या जन्मोत्सोवानिमित्त 'रूहानी मैफल' उत्साहात संपन्न
देवळाली /भगुर (विशेष प्रतिनिधी):
सावन कृपाल रूहानी मिशन, देवळाली यांच्या वतीने परम पूज्य संत राजिंदर सिंग जी महाराज यांच्या ८० व्या जन्मोत्सोवाच्या पावन प्रसंगी शनिवार (दि. ३) रोजी रात्री ८.०० वाजता 'दर्शन अकादमी, कृपाल आश्रम' येथे विशेष वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि श्रद्धाभावाने आयोजित करण्यात आला होता. महाराजजींच्या दिव्य जीवनाचे व कृपेचे ८० वर्षे साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक कुटुंबासह उपस्थित होते.
या पावन प्रसंगी मुंबईचे प्रसिद्ध संगीतकार श्री. अमन पंत यांच्या प्रस्तुत 'रूहानी मैफल' (रूहानी कव्वाली) या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय कव्वाली आणि भजनांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर अध्यात्मिक आनंदाने उजळून निघाला. उपस्थित भाविकांनी या रूहानी संध्याकाळाचा भरभरून आनंद घेतला.
यासोबतच, दर्शन अकादमीच्या बालसंगोपन शिक्षिका ज्योती नेहदेव आणि नृत्यदिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर सांस्कृतिक व नृत्य सादर केले, ज्याचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून आनंदत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर आयोजकांतर्फे भव्य लंगर प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामध्ये सर्व भाविकांनी महाप्रसाद ग्रहण केला. लंगर सेवा आणि वाटपात सेवाभावी कार्यकर्त्यांनी पूर्ण समर्पणाने सेवा दिली.
या पावन प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार त्रिषा तारवाणी व डॉ. देवी लखमीयांनी यांनी केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सावन कृपाल रूहानी मिशन (देवळाली) समिती आणि दर्शन अकादमीच्या मिशन समिती पदाधिकारी: हुंदराज नागदेव (अध्यक्ष), सीताराम मगदेव (कोषाध्यक्ष), धीरज लुल्ला (सचिव).
समिती सदस्य: श्रीचंद नागदेव, जयकुमार नागदेव, विनय तारवाणी, जितेंद्र भाटिया, लता दीहलानी.
लंगर व सेवादार समिती: वर्षा तारवाणी, लता खत्री, संगीता वाधवानी, तारा नागदेव, लता लुल्ला, सरस्वती डीयालानी, प्रमिला लुल्ला व इतर सत्संगी भगिनी तसेच लंगर वाटप समिती.
श्री. के. ए. थॉमस (प्राचार्य, दर्शन अकादमी, देवळाली).या अध्यात्मिक व सांस्कृतिक संध्याकाळाची सांगता संत राजिंदर सिंग जी महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आणि विश्वशांतीच्या प्रार्थनेने झाली.