अध्यात्मकतेचे मनुष्याच्या व्यवहारिक जीवनात खूप मोठे महत्त्व हभप कथाकार मारुतीप्राण दास भक्तीशास्त्री महाराज

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 02/10/2026 12:16 PM

अध्यात्मकतेचे मनुष्याच्या व्यवहारिक जीवनात खूप मोठे महत्त्व हभप कथाकार मारुतीप्राण दास भक्तीशास्त्री महाराज

भगूर वार्ताहर :- आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत प्रत्येक मनुष्याने दैनंदिन गरजेत अनावश्यक गोष्टी सोडल्या पाहिजे मनुष्याच्या जीवनात अहंकार नसावा अभिमान नसावा सोबत फक्त आपले सत्कर्मच येते, जीवनात प्रभावापेक्षा स्वभाव महत्त्वाचा आहे.धनदौलत हे माझे ते माझे परंतु सत्यता ही आहे सोबत काहीच येत नाही म्हणून अध्यात्म अंगीकारावे व्यवहारिक जीवनात अध्यात्मकतेचे खूप मोठे महत्त्व आहे असे प्रतिपादन श्रीमद् भागवत कथाकार मारुती प्राण दास भक्ती शास्त्री यांनी केले देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वार्ड क्रमांक आठ विजय नगर येथील सुप्रसिद्ध मातोश्री लॉन्स येथे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना इस्कॉन परिवार भगूर यांच्या वतीने भव्य श्रीमद भागवत आयोजन करण्यात आले असून यावेळी कथेत हभप मारुती प्राण दास महाराज उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन करत होते. पुढे बोलताना महाराजांनी सांगितले भगवंताला भावना आहे भगवंताला वेदना होतात आपण प्रत्येकाने वेळेला महत्व दिले पाहिजे वैकुंठ याचा अर्थ सांगताना वय नाही कुंठ दुःख नाही हे सांगताना आपण आपले स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे आपण दुसऱ्याशी तुलना करताना आपण काय करतो याचाही विचार केला पाहिजे.जीवनात आई-वडिलांची सेवा यासारखं सत्कर्म व पुण्य नाही.श्रीमद् भागवत कथा ऐकल्याने मनुष्याचे कल्याण होते या कथेतून संस्कार मिळतात आणि संस्काराचे आचरण केल्याने जीवन जगण्याचे सार्थक होतेजीवन यशस्वी व आनंदी होते. प्रत्येकाने आपल्या जीवनात सकारात्मक विचाराने व समाधानी मनाने जीवन जगणे अभिप्रेत आहे.या युक्तीनेच आपणास सदैव आनंद व समाधान लाभेल असेही समाज प्रबोधन करताना हभप मारुतीप्राण दास यांनी सांगितले. कथेस भगूर विजयनगर देवळाली कॅम्प यासह ग्रामीण भागातील नागरिक व विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे. इस्कॉन या संस्थेच्या माध्यमातून जगभरात समाज उपयोगी उपक्रमासह विविध आरोग्यविषयक शिबिरे,व्याख्याने यासह समाज जनजागृती करण्याचं कार्य इस्कॉनच्या माध्यमातून सुरू आहे.भगूर येथेही इस्कॉन परिवाराच्या वतीने दर शनिवारी सर्वांसाठी सत्संग घडत असते.श्रीमद् भागवत कथा यशस्वीतेसाठी हा सर्व समाजउपयोगी उपक्रम राबविण्यासाठी इस्कॉनचे पदाधिकारी व भागवत कथेचे संपर्कप्रमुख विठ्ठल हारक प्रभुजी, राजाराम सानप प्रभुजी, प्रदीप घोगरे प्रभुजी, वसंत खैरनार प्रभुजी, गौरव शिंदे प्रभुजी ललितजी भदे संतोष गारे, संदीप जी शेटे,सानप प्रभू शंकर दळवी तसेच भगूर विजयनगर व परिसरातील इस्कॉनचे पदाधिकारी सभासद प्रयत्नशील आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या