* *आशीर्वाद सोहळा*
श्री एकनाथराव सहादू शेटे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद सोहळा पार पडला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहकार्यवाह जितेंद्रजी भावसार ,महाविद्यालयाचे प्राचार्य मृत्युंजय कापसे, IQAC समन्वयक अमलेश भोंगाडे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.मृत्युंजय कापसे यांनी केले. अमलेश भोंगाडे यांनी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच माजी विद्यार्थिनी माधुरी आडके हिनी तिचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्रजी भावसार यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सतत तत्पर राहण्याचा कानमंत्र दिला तसेच यथायोग्य मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहिणी जगताप यांनी केले.आभार प्रा. ज्योती वाजे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा.मेघा काळे, प्रा.श्रुती जोशी, प्रा. अश्विनी ठाकरे यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाची सांगता पसायदान घेऊन करण्यात आली.