9545918191 हा Whatsapp नंबर होणार सहाय्य स्वच्छ मनपा सुन्दर मनपा ,तत्पर प्रशासन साठी
आयुक्त तथा प्रशासक श्री.रविकांत आडसूळ यांचे संकल्पनेतून नागरिक करू शकतात व्हाट्सअप्प वर तक्रारी .प्रशासन करणार सत्वर निराकरण ,
सदरची सुविधा नागरीकांसाठी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वतीने देण्यात येणार आहे.
जसा मोबाईल हा गरजेचा,,,
तसा व्हाट्सअप्प देखील होईल तक्रारी निवारणासाठी नित्याच्या --मा रविकांत अडसूळ आयुक्त
मा.मुख्यमंत्री महोदय यांचे 100 दिवसांचा सात कलमी कार्यक्रम अंतर्गत प्रशासकीय गतिमानता अभियान सुरु आहे. सदर अभियान अंतर्गत नागरीकांना तक्रारी करणे सुलभ-सोपे होण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने 95 45 91 81 91 हा Whatsapp क्रमांक सुरु केला आहे. सदर क्रमांकावर नागरीक मनपाशी संबंधित आपल्या भागातील सार्व.तक्रारी / वैयक्तिक तक्रारी दाखल करु शकतील.
सदर तक्रार मनपा मार्फत संगणकीकृत करुन संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील.
तक्रारीची योग्य नोंद होण्यासाठी व सद्य:स्थिती समजण्यासाठी नागरीकांनी स्वत:चे नांव, मोबाईल क्रमांक, तक्रारीचे स्वरुप, (तक्रारीचा फोटो - pdf file) तक्रार ज्या ठिकाणची आहे त्या ठिकाणचा पत्ता इ. माहिती वरील whatsapp क्रमांकावर पाठविणे आवश्यक आहे.
याबाबत मेसेज द्वारे नागरीकांना तक्रारची सद्य:स्थिती समजेल व तक्रार निर्गत झाल्यानंतर देखील कळविण्यात येईल.अशी माहिती सहा आयुक्त नकुल जकाते यांनी दिली आहे.
प्रशासकीय कामकाज गतिमान होण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेमार्फत नागरिक संवाद आणि तक्रार निवारण उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांसाठी सुलभ असे माध्यम तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना व्हाट्सअप द्वारे तक्रारी देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत खालील व्हाट्सअप नंबर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यावर तसेच नागरिक संवाद तक्रार निवारण क्रमामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद स्वतंत्रपणे सॉफ्टवेअर मध्ये घेऊन प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे याच्या नियंत्रणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून त्याची ट्रेकिंग रोजच्या रोज करून पाठपुरावा करून तक्रारी निर्गत करण्यात येणार आहेत त्यामुळे नागरिकांनी या नवीन सुविधेचा लाभ घेऊन आपल्या तक्रारी मांडण्यासाठी वापर करावा . नागरिकांनी 95 45 91 81 91 व्हाट्सअप्प नंबर वर आपली तक्रार नोंदविण्यासाठी वापर करून मनपाची ही सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात प्रसिध्द करून लोक सहभाग वाढवा.आपले शहर स्वच्छ आणि सुन्दर ठेवण्यासाठी मोहीम व्यापक करावी असे आवाहन मा रविकांत अडसूळ यांनी केले आहे.