कुपवाड : येथील राणाप्रताप मंडळाचा राष्ट्रीय खो-खो खेळाडू काशिलींग हिरेकुर्ब याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत खेळाडू कोट्यातून महाराष्ट्र पोलीस मध्ये क्लार्क पदी निवड झाली आहे.
राणाप्रताप मंडळाचे 50 हून अधिक खेळाडू शासकीय, निमशासकीय सेवेत आहेत. खेळाडू कोट्यातून शासकीय सेवेत निवड होणारा काशिलींग हा राणाप्रताप मंडळाचा 50 वा खेळाडू आहे.
राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील,रमेश पाटील, प्रशिक्षक संतोष कर्नाळे,प्रा.सचिन चव्हाण, संजय हिरेकुर्ब, शितल कर्नाळे, महेंद्र पाटील, विजय पाडळे,महेश कर्नाळे,अतुल पाटील, प्रा.विजय पाटील, सागर नरदेकर, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे,अनिल पाटील, धनपाल आडमुठे, महावीर राजोबा,स्वप्निल पाटील, वासुदेव जमदाडे, अनिल हिरेकुर्ब.आंदिचे काशिलींग हिरेकुर्ब यास मार्गदर्शन मिळाले.