स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही : कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या दोन मालवाहक ट्रकसह ५४ लाख रूपयांचा गाय, बैल (गोवंश) जप्त
चंद्रपुर जिल्ह्यामध्ये मा. श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे, व्यवसाय करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक मा. श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या कत्तलीसाठी जनावरांची वाहतुकीची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू आहे.
आज दिनांक १६/०४/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, रात्रीच्या वेळी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी वरून मुल चंद्रपुर मार्गाने तेलंगाणा राज्यात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरांची अवैध वाहतुक होणार आहे. सदर माहितीवरून लागलीच नाकाबंदी करून व सापळा रचुन चामोर्शी वरून येणाऱ्या दोन संशयीत ट्रकला थांबविले असता, मागच्या ट्रकमधील ड्रायव्हर व त्याच्या सोबतचा एक इसम पळून गेला. सदर दोन्ही ट्रकमध्ये पाहणी केली असता, दोन्ही ट्रकला प्लॅस्टीकच्या ताडपत्रीने वरून झाकुन त्यामध्ये ३५-३५ असे एकुण ७० गाय, बैल (गोवंश) (ट्रकसह एकुण किंमत ५४ लाख रूपये) दाटी-वाटीने, कोणत्याही प्रकारची चारा-पाण्याची व्यवस्था न करता, त्यांना आडवे पाडून, चारही पायांना दोराने बांधुन वाहतुक करून कत्तलीसाठी नेत असल्याचे दिसून आले. एका ट्रकमधील ड्रायव्हर यास ताब्यात घेतले असून दोन्ही ट्रकमधील सर्व गोवंश प्यार फाऊंडेशन (गौरक्षण संस्था), पडोली येथे गोवंशांच्या संरक्षणाकरीता जमा करण्यात करण्यात आले. आरोपींविरोधात पोस्टे मुल येथे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढिल तपासकामी पोस्टे मुल यांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपींची नावे :-
१) राजीक जब्बार खान, वय ५० वर्ष, धंदा चालक, रा. गडचांदुर, जिल्हा चंद्रपुर (चालक)
२) शाहरुख खान, रा.नागपूर, जि. नागपूर,
३) करीम खान, रा. नागपुर, जि. नागपुर
४) राजु कुरेशी, रा. कामठी रोड, पिली नदी जवळ, नागपुर (मालक)
५) इरफान शेख, रा. गडचांदूर, जि. गडचांदुर
६) प्रशांत बाला जुमनाके, रा. गडचांदुर, जि. चंद्रपुर
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि, विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोउपनि. सुनिल गौरकार, पोहवा. सुभाष गोहोकार, पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा. सतिश अवथरे, पोहवा. दिपक डोंगरे, पोहवा. सुरेंद्र महंतो, पोहवा. चेतन गज्जलवार, कार्तीक खनके (सायबर पो.स्टे.), पोशि. प्रशांत नागोसे, किशोर वकाटे, गणेश भोयर, शशांक बदामवार, चापोहवा. दिनेश आराडे, चापोअं. मिलींद टेकाम, स्थागुशा चंद्रपुर, पोस्टे तळोधी येथील सपोनि. संगिता हेलोंडे, पोहवा रत्नाकर देहारे, अक्षय हटवार, सुरेश आत्राम यांनी केली आहे.