सांगली ता. १७,
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका आयुक्त म्हणून सत्यम गांधी या नवख्या व अनुभव नसलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करून सरकारने माथी मारले : चंदनदादा चव्हाण.
बदली झालेले शुभम गुप्ता यांच्या नंतर नवखे अनुभव नसलेले अधिकारी सरकार का माथी मारत आहेत?पालिकेला आर्थिक सक्षम करण्याची गरज आहॆ. शहरातील विकास कामे जैसे थे ठप्प आहेत.
पालिकेची सर्व खाती कोम्यात गेली असून कुणाचा कुणाला माग मोस राहिला नाही.प्रचंड अंधाधुंदी माजली आहॆ. अनुभवी अतिरिक्त रविकुमार अडसूळ सारखे अनुभवी अधिकारी जर सरकारने नेमले असतें तर पालिकेचा कारभार अधिक सुधारण्यास मदत झाली असती. सरकारला हे करायचे दिसत नाही.
शहरांची अवस्था बकाल होत आहॆ.त्यात जनतेच्या कामाला प्राधान्य दिले जात नव्हते. मा अडसूळ साहेब यांनी थेट पालिकेत जनतेच्या तक्रारीचे निवारण अभियान राबवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहॆ.
आपली महापालिका सर्वांगीण दृष्ठ्या सक्षम, पारदर्शी कारभार व्हावी यासाठी नवखे आयुक्त सरकारने तात्काळ बदलून अनुभवी आयुक्त नेमवा यासाठी येत्या बुधवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून जयहिंद सेना मागणी करणार असल्याचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी जाहीर केले आहॆ.