वानलेस वाडी येथील गल्ली क्रमांक एक दोन नवीन कोर्ट इमारतीच्या पूर्वेस गेले वर्षभर या दोन्ही गल्ल्यांमध्ये पिण्याचे पाणी रोज येत नाही तसेच जेव्हा केव्हा येते तेव्हा तळमजल्यावरील जमिनीखालील टाकीत सुद्धा 30 किंवा 40 लिटर सुद्धा पाणी येत नाही पाणीपुरवठा अधिकारी पाणी सोडणारे कर्मचारी नगरसेवक यांना हे सगळे समक्ष अनेक वेळा दाखवले आहे पाणी बिल भरण्याचा आग्रह करण्यासाठी मार्च महिन्यात कर्मचारी घरोघर फिरत होते त्यावेळी देखील त्यांना अपुरा पाणीपुरवठा आहे याची समक्ष माहिती दिली परंतु वर्षभराप्रमाणेच पाणीपुरवठा अत्यंत अपुरा अनियमित होत आहे . अनेक नागरिकांना पिण्याचे पाणी रोज लांबून विकत आणावे लागते ते फार खर्चिक आहे आणि सोयीचे नाही या भागात खूप ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी राहतात त्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये रोष उत्पन्न झाला आहे
याच भागातील दक्षिणेकडील गल्ली क्रमांक चार पाच सहा सात यामध्ये सकाळ संध्याकाळ भरपूर पाणीपुरवठा होतो गटारी मधून पाणी वाया जाताना पण दिसते पाण्याचे योग्य नियोजन करून गल्ली क्रमांक एक दोन तीन मध्ये पुरेसे पाणी देता येऊ शकते तरी कृपया आपण समक्ष तातडीने लक्ष घालून या भागांमध्ये पुरेसा व वेळेवर पाणीपुरवठा होईल यासाठी योग्य ती कार्यवाही करावी
आपले
समस्त क्रांतीनगर गल्ली क्र. १आणि २
मो. नं. ९९२३१२७२९८
एस सी पोरे पोलीस निरीक्षक सेवा निवृत्त