सांगली: राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पेट्रोल व डिझेल च्या वाढत्या महागाई बद्दल केंद्र सरकारच्या या महागाई धोरणा विरोधात आज एल्गार आंदोलन करण्यात आले
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील , युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या सूचनेनुसार व शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले
सध्या कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर (प्रति बॅरल $६५.४१) आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये किंमत प्रति बॅरल $६३.४०होती. या घसरणीमुळे, पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहे. रेटिंग एजन्सींनुसार, सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर ₹१२ ते १५ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ₹६ ते १२ रुपये नफा कमवत आहेत. असे असूनही, तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत. सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे.
याच्याच निषेधार्थ आज सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवक शहरजिल्हा कार्याध्यक्ष संदीप व्हनमाने ,मा.नगरसेवक हरिदास पाटील, सांगली शहराध्यक्ष अरुण चव्हाण , मिरज अध्यक्ष शाबाज कुरणे ,आकाराम कोळेकर ,डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे,सरचिटणीस अकबर शेख ,अक्षय अलकुंटे ,आदित्य नाईक , जहीन कुरणे ,आरबाज लोकपुरे , मारुफ काझी ,वाहिद खतीब ,अक्षय माने ,बैजू बोडरे ,सयाजी बनसोडे,अवधूत दुधाळ ,मयूर माने,राहुल रुपनर आदी पदाधिकारी उपस्थित होते.