मनपा विध्युत बिल घोटाळा चौकशी कुठपर्यंत?? , नागरिक जागृती मंचचा सवाल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/04/2025 5:59 PM

प्रति 
मा.आयुक्त 
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका 

विषय :- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मधील विद्युत घोटाळा बाबत...

महोदय,

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये महानगरपालिका विद्युत विभाग व महावितरण बिलिंग विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा घडला आहे 
आमच्या नागरिक जागृती मंच वतीने आम्ही सदर घोटाळा उघडीस आणून त्यावर वाचा फोडली.
मात्र महानगरपालिका अथवा महावितरण कडून सदर घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्यासाठी कोणतीही उचित कार्यवाही झालेली दिसली नाही म्हणून आम्ही मा लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मा लोक आयुक्त यांनी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले त्या सुद्धा चाल ढकल झाल्यानंतर आम्ही परत आपील केली आंदोलनाची हाक दिल्यानंतर घाईगडबडीने सदर एसआयटी नेमण्यात आलेली आहे मात्र आज तागायत सदर एसआयटीने काय तपास केलाय अथवा काय रिपोर्ट केलेला आहे तो कळत नाही.
आम्ही सदर घोटाळा उघडी झाल्यानंतर 2008 पासून ते आतापर्यंत विद्युत बिलांचे ऑडिट करा अशी मागणी केली होती तसेच विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेमध्ये याबाबत लक्षवेधी केल्यानंतर शासनाकडून कार्यवाहीचे आदेश आले मात्र त्याबाबत उचित कार्यवाही झालेली दिसत नाही 
पाच वर्षाचे विद्युत बिलांच ऑडिट केल्यानंतर आमच्या माहितीप्रमाणे पाच कोटी 92 लाख रुपये घोटाळा झाला आहे हा सरळ सरळ मनपा तिजोरीवर टाकलेला दरोडा आहे मात्र कोणीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कारवाई केलेली नाही 
एका बाजूला महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना सरळ सरळ हा घोटाळा झाला आहे सदर पैसे वसूल झाल्यानंतर मनपाचा आर्थिक फायदा होणार आहे तरी आपण याबाबत वैयक्तिक लक्ष घालून सदर घोटाळे चे पैसे वसूल करावेत अशी विनंती आहे.

सतीश साखळकर, वी द बर्वे तानाजी रुईकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या