भगूर येथे नटराज फ्रेंड्स सर्कलतर्फे पाणपोईचे उद्घाटन
उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी भगूर येथील मेनरोड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम अनिल मेडिकलसमोर जेष्ठ नागरिक श्री नारायण कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला.
या उपक्रमाद्वारे उन्हाळ्यात होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नागरिकांना थंड पाणी पुरवण्याचे कार्य केले जात आहे. मेनरोड फ्रेंड्स सर्कलने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक हिताच्या कामात पुढाकार घेतला आहे. उन्हाळ्यात उष्माघातासारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हा प्रकल्प राबवला जातो.
कार्यक्रमाचे संचालन संभाजी देशमुख यांनी केले. यावेळी अनेक भगूरवासीयांनी या पाणपोई उपक्रमाचे कौतुक केले व या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहिले. पाणपोईमुळे नागरिकांना उन्हाच्या काहिलीत मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी दादासाहेब देशमुख, संजूशेठ गणोरे, काकासाहेब देशमुख, मनोहर आंबेकर, विक्रम सोनवणे, मोहम्मद मन्सुरी, राजेंद्र मगर, अंबादास सूर्यवंशी, किशोर पवार, शेरीफ मन्सूरी, प्रविण वाघ, राजेश मानधणे, संतोष मोजाड, महेश वाघचौरे, राहुल थोरात, अमोल गणोरे, शरद शिवले, शंभु थोरात, ओम देशमुख आदी उपस्थित होते.