ना विद्युत पुरवठा.. ना सोलर कृषी पंप.. कोरची तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांची पिळवणूक

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 18/04/2025 8:39 AM



जगाच्या पोशिंदावर उपासमारीची पाळी

सौर कृषी पंप लावतो सांगून कोरची येथील कर्मचाऱ्यांनी घेतले पैसे



कोरची :- मागील काही वर्षांपासून विद्युत विभागाच्या ढिशाळ कारभारामुळे सामान्य जनतेसोबत शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून जगाचा आता  हाता तोंडाशी आलेला घास हिरावत असल्यामुळे हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे. 
            भार नियमन करून सुद्धा विद्युत विभागातर्फे अत्यंत कमी दाबाचा विद्युत पुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांचे महागडे उपकरण निकामी होत असून यामुळे सामान्य जनतेला भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. तसेच विद्युत विभागाशी निगडित असलेल्या दुकानदारांनी व्यवसाय करावे तरी कसे? असा प्रश्न उत्पन्न होत आहे.
            जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा कृषी पंपासाठी महागडे डिमांड भरले परंतु मागील कित्येक महिन्यांपासून या ग्राहकांना मिळाले फक्त तारीख पे तारीख. काही शेतकऱ्यांनी वेळेवर सौरपंप लावून देण्यात येईल या आश्वासनावर रबी पीक सुद्धा घेतले परंतु आता या शेतकऱ्यांचे पीक करपू लागल्याने आपल्या अख्ख्या आयुष्याची कमाई आपल्या शेतावर लावणारा शेतकरी हवालदिल झाला असून आपल्यापरिवाराचे उदरनिर्वाह करायचे तरी कसे? असा प्रश्न सदर शेतकऱ्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे.
             


कोट
आम्हाला ऑक्टोंबर महिन्यात सौर ऊर्जा पंप लावण्याकरिता डिमांड भरण्यास कंपनीकडून सांगण्यात आले व डिसेंबरमध्ये जोडणी करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले परंतु अजून पर्यंत वीज जोडणी करण्यात न आल्यामुळे माझ्या शेतावर प्रचंड नुकसान झाले आहे आम्ही सोलर लवकर मंजूर करून देतो म्हणून विद्युत विभागाच्या एका कर्मचाऱ्यांनी प्रत्येक ग्राहकांकडून हजार रुपयाची मागणी केली असून ती आम्ही त्या कर्मचाऱ्याला दिली सुद्धा आहे.
योगेश जमकातन
शेतकरी, मोहगाव


आम्हाला डिसेंबर महिन्यांपासून डिमांड भरून सुद्धा तात्काळ ठेवण्यात आले आहे परंतु आता सदर कंपनी वाले आमचा फोन सुद्धा उचलत नाही साहेबांकडून सुद्धा प्रतिसाद मिळत नाही.
उकाजी शेंडे
शेतकरी, कोरची


जर कंपनी वाले वेळेवर सोलर पंप लावून देत नसतील तर त्यांना नोटीस पाठवून त्यांच्यावर कारदेशीर कार्यवाही करण्याचे पत्रव्यवहार करण्यात आले आहे व पैशाची मागणी करणाऱ्या विरुद्ध ग्राहकाने तक्रार करावे त्यांच्याविरोधात सुद्धा कार्यवाही करण्यात येईल व कुणीही आमच्या कर्मचाऱ्यांना सौर ऊर्जेसाठी पैसे देऊ नये असे ग्राहकांना आवाहन करतो
सुमित वांढरे
उप कार्यकारी अभियंता
म.रा.वि.वि. कोरची

Share

Other News

ताज्या बातम्या