महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादी श. प. पक्षाकडून जयंती निमित्त सांगली व माधवनगर मध्ये अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2025 2:30 PM

आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगली तसेच माधवनगर शहरामधील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरजिल्हा उपाध्यक्ष तथा मा.नगरसेवक हरिदास पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे,कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन माने व राष्ट्रवादी कामगार सेलचे सर्व पदाधिकारी तसेच
माधवनगरचे राष्ट्रवादी शरदचंद्र समाजिक न्याय विभागाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन साबळे,माधवनगरचे ज्येष्ठ नेते बबन आवळे,तेजस नांद्रेकर,समाधान मोहिते आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या