.भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी माजी उपजिल्हाधिकारी काशिनाथ उबाळे शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा हा विचार सर्वांनी अंगीकरून समाजात चांगले नागरिक व्हा असे प्रतिपादन माजी उपजिल्हाधिकारी काशिनाथ उबाळे यांनी केले, भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने भारतरत्न प. पू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या, जयंती उत्सवाप्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संस्थेचे अध्यक्ष खंडेराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास, काशिनाथ उबाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास व स्वा, वीर सावरकर यांच्या पुतळ्यास शिवाजी घोरपडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी खंडेराव गायकवाड, श्रीराम कातकडे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमास कचेशवर मोरे, किरण बेदरकर, दिलीप चव्हाण, रमापती चौहान, त्रंबक करंजकर, दिलीप वालझाडे, मारुतीराव कोरडे, नरेंद्र जोशी, स, दा, सांबरे, शिवाजी नलावडे, नारायण आडके, देवराम मुठाळ, बबनराव आडके, चंद्रकांत काळे, रामचंद्र पिसाळ व असंख्य सभासद उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रशांत कापसे तर आभार दिलीप चव्हाण यांनी मांडले