"सीताबाई संगई विद्यालय अंजनगाव सुर्जी मधून सत्र 2024 - 2025 NMMS परीक्षा अंतर्गत 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र"

  • Nitin Ganorkar (Paratwada)
  • Upadted: 09/04/2025 5:08 PM

अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इयत्ता आठवी करिता सत्र 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सीताबाई संगई विद्यालय अंजनगाव सुर्जी येथील 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र ठरले. या परीक्षेचे उद्दिष्ट म्हणजे इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील म्हणजे ज्या पालक माता-पिताचे एकत्रित उत्पन्न रु. 3,50,000 पेक्षा कमी आहे. अशा प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे. याकरिता सदर शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्याला दरमहा रु.1000 प्रमाणे वार्षिक रु.12000 असे लगातार चार वर्ष एकूण रु.48,000 चे आर्थिक सहाय्य करणे, असे 12 विद्यार्थ्यांना चार वर्षात रु.5,76,000 प्राप्त होतील. तसेच विद्यार्थ्याचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्रसेवा घडावी हा अत्यंत महत्त्वाचा उद्देश दिसून येतो. या परीक्षेकरीता महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य अनुदानित,स्थानिक संस्थेतील इयत्ता आठवीत शिकत असलेला विद्यार्थी असावा लागतो. ही परीक्षा केंद्रशासन मार्फत शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी सत्र 2007-2008 पासून सुरू केली व याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना दिलेली आहे. सदर शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये जय प्रमोद सयम,ओम गजानन येवकार,उमंग अनिल निपाने,विनायक मोहन भोंडे, नैतिक संतोष भेले,वैभव मनोहर अस्वार, चैतन्य निलेश येऊल, अथर्व शरद राजस, शिवम अनिल नेमाडे, पार्थ नरेश भोंडे, पार्थ गजेंद्र येऊल ,अनुप दीपक तायडे. या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे सीताबाई संगई एज्युकेशनचे मा.अध्यक्ष अविनाश संगई मा.उपाध्यक्ष डॉ.उल्हास संगई मा.सचिव विवेक संगई तसेच विद्यालयाचे मा.प्राचार्य राकेश डोणगावकर मा. उपमुख्याध्यापक राजेश वैद्य व मा.पर्यवेक्षक डॉ.निलेश डहाळे सोबतच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या