1) *सांगली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 व 3 वर लवकरच चहा, नाष्टा सुविधा सुरू होणार.*
खाद्यपदार्थ विक्रीचा फूड स्टॉल लवकरच प्लॅटफाॅर्म 2 व 3 वर टाकण्यात येईल ही महिती नागरिक जागृती मंचला पीएमओ द्वारे कळविण्यात आली आहे.
2) *सांगली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी दोन हमाल नियुक्त*
सांगली रेल्वे स्टेशनवर दरवर्षी सुमारे 20 लाख प्रवासी चढ-उत्तर करतात. यातील रुग्ण, वयस्कर नागरिक, गरोदर स्त्रिया व दिव्यांगजन यांना अवजड सामान चढवणे उतरवणे साठी नागरिक जागृती मंचने सांगली रेल्वे स्टेशनवर कुली/हमालाची सुविधा मागितली. ती मागणी मध्य रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांनी मान्य केली. दोन हमाल सांगली रेल्वे स्टेशनवर तैनात करण्यात आले असून या सुविधांचा वापर नागरिकांनी करावा.
3) *सांगली रेल्वे स्टेशनचे 1 ते 5 सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा व पूर्व बाजूच्या रस्त्यापर्यंत जाणारा पादचारी पूल लवकरच पूर्ण होणार*
कुपवाड एमआयडीसी, तानंग, बामनोली, संजयनगर, अभयनगर, यशवंतनगर, शिंदेमळा, लवली सर्कल, माधवनगर, साखर कारखाना पिछाडीचा परिसर, सह्याद्रीनगर, जवाहर कॉलनी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती की सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूच्या रस्त्यावर प्रवेशद्वार मेळावा. जेणेकरून शहराच्या या परिसरातून येणाऱ्या नागरिकांची सोय होईल. नागरिक जागृती मंचने या मागण्यासाठी पीएमओ कडे तक्रार केली. या मागणीला मान्य करत मध्य रेल्वेने सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्व दिशेच्या रस्त्यापर्यंत पोहोचणारा पादचारी पूल देण्याचे वचन दिले असून लवकरच सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूच्या रस्त्यावरून येण्या-जाण्यासाठी पादचारी पूल उपलब्ध होईल. हा पादचारी पूल रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूच्या रस्त्यावरून रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3, 4 व 5 ना जोडेल. कुपवाड, विश्रामबाग, माधवनगर, संजयनगर इत्यादी परिसरातील लोक पूर्व बाजूच्या पादचारी पुलावरूनच सांगली स्टेशनवर येऊ शकतील. प्रवाशांचा वेळ व पैसा वाचेल. या पादचारी पुलामुळे रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्यावर काम करणाऱ्या हमालांची मोठी सोय होणार आहे स्टेशनच्या पश्चिम दिशेतून पूर्व दिशेला जाण्यासाठी मोठी सोय होणार.
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप तसेच पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना यांच्या मदतीने वारंवार जिल्हा मुख्यालयाचे सांगली रेल्वे स्टेशन तसेच जिल्हातील इतर 20 रेल्वे स्टेशनच्या विकासाबाबत गेल्या 5 वर्ष प्रयत्न केले आहेत.
या प्रयत्नांना आता हळूहळू यश येऊ लागले आहे व वरील मागण्या मान्य झाल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
*बाहेरगावहून सांगली स्टेशनवर येणार्या-जाणार्या प्रवाशांची मोठी सोय होणार*
सांगली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 2 व 3 वरून सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस, बंगलोर-सांगली राणी चेन्नम्मा एक्सप्रेस, सांगली-परळीवैजनाथ एक्सप्रेस, परळीवैजनाथ-सांगली एक्सप्रेस, सांगली-मिरज लोकल गाडी, कोल्हापूर-सांगली लोकल गाडी, यशवंतपुर-चंदीगड संपर्कक्रांती व चंडीगड-यशवंतपूर संपर्कक्रांति सारख्या प्रमुख रेल्वे गाड्या प्लॅटफाॅर्म 2 व 3 वर थांबतात. त्यायतिरिक्त अन्य 15-20 गाड्या प्लॅटफाॅर्म 2 व 3 वर थांबतात. प्लॅटफॉर्म दोन व तीन वरून रेल्वे गाड्यांमध्ये चढ उत्तर करणाऱ्या असंख्य प्रवाशांना चहा नाश्ता जीवन साठी प्लॅटफॉर्म नंबर एक वर जावे लागत होते पण आता नागरिक जागृती मंचणे विनंती केली आहे की इतर रेल्वे स्टेशन प्रमाणे सांगली रेल्वे स्टेशनवर देखील प्लॅटफॉर्म नंबर दोन व तीन वर खाद्यपदार्थ विक्री करणारा फूड स्टॉल टाकावा. ही मागणी मध्य रेल्वे पुणे विभागाने मान्य केली असून लवकरच सांगली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर दोन व तीनवर खाद्यपदार्थ विक्री करणार आहोत यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. मुख्यत्वे वयस्कर नागरिक, गरोदर स्त्रिया, दिव्यांगजन, लहान बाळाला घेऊन प्रवास करणाऱ्या स्त्रिया तसेच रुग्णांची मोठी सोय होईल कारण त्यांना आता खाद्यपदार्थ प्लॅटफॉर्म नंबर 2 व 3 वर मिळतील.
*सांगली रेल्वे स्टेशन सहित जिल्ह्यातील इतर 20 रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच कटिबद्ध*
सध्या किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर कोल्हापूर-पुणे वंदे भारत गाडी थांबा मःळवून दिला असून भिलवडी, ताकारी, जत रोड व कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवर सातारा-पंढरपूर-कुर्डूवाडी-दादर एक्सप्रेसचा थांबा मिळवून दिला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या भिलवडी, किलोस्करवाडी, ताकारी परिसरातून जत रोड, कवठेमंकाळ, ढालगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी भिगवण, जेऊर तसेच सोलापूर जाणे अतिशय सोपे झाले आहे.
*जिल्हा मुख्यालयाच्या सांगली रेल्वे स्टेशनला सोलापूर जिल्ह्याशी जोडणार*
सांगली जिल्ह्यात असणाऱ्या रेल्वे मार्गांच्या जाळ्याचे फायदे जिल्ह्याला व्हावे यासाठी कमी प्रवाशांमुळे तोट्यात असणारी असणारी कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेस येता-जाता सांगली मार्गे आणून सांगली स्टेशन येथे थांबावी यासाठी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच प्रयत्नशील आहे. लवकरच कोल्हापूर-कलबुर्गी गाडी सांगली मार्गे धावेल व सांगली स्टेशन वर थांबेल ही अपेक्षा आहे. सांगलीत थांबा मिळाल्यामुळे या गाडीची तिकीट विक्री व उत्पन्न वाढेल. सांगली जिल्ह्याचा थेट संपर्क सोलापूर जिल्ह्याची स्थापित होईल.
*कर्नाटकात जाणारे-येणारे प्रवासी थेट विश्रामबाग व सांगली पर्यंत पोहोचावे याबाबत प्रयत्नशील*
कर्नाटकातून येणाऱ्या हुबळी-मिरज एक्सप्रेस, लोंढा-मिरज एक्सप्रेस, कॅसलरॉक-मिरज पॅसेंजर व बेळगाव-मिरज पॅसेंजर तसेच कुर्डूवाडी-मिरज डेमू पॅसेंजर गाड्यांना पुढे सांगली स्टेशन पर्यंत विस्तारित करून विश्रामबाग स्टेशनवर थांबा देण्यात यावा यासाठी नागरिक जागृती मंच व जिल्ह्यातील प्रवासी संघटना प्रयत्नशील आहेत. लवकरच या बाबतीत यश मिळेल ही खात्री आहे. या सर्व गाड्या सांगली रेल्वे स्टेशन पर्यंत विस्तारित झाल्यानंतर विश्रामबाग रेल्वे स्टेशनवर चढता-उतरता येणार असून लोकांना विश्रामबाग, विजयनगर येथील जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, भारती हाॅस्पिटल व विश्रामबाग येथील असंख्य कॉलेजला जाण्यासाठी सोय होणार आहे. जवळपास 10 गाड्या रोज विश्रामबागला थांबतील त्यामुळे विश्रामबाग रेल्वे स्टेशनचा मोठा विकास होईल.
*सर्व संपर्क क्रांति गाड्या जिल्हा मुख्यालय सांगली रेल्वे स्टेशनवर थांबाव्यात*
सध्या आठवड्यातून 2 दिवस धावणारी चंडीगड-यशवंतपुर संपर्कक्रांति व यशवंतपूर-चंडीगड संपर्कक्रांति या 2 गाड्या सांगली रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्याव्यतिरिक्त आठवड्यातील इतर 2 दिवस याच वेळेत धावणार्या निजामुद्दीन-यशवंतपुर संपर्कक्रांति व यशवंतपूर-निजामुद्दीन संपर्कक्रांती गाड्या देखील सांगली रेल्वे स्टेशनवर थांबाव्यात यासाठी नागरिक जागृती प्रयत्नशिल आहे.
जत रोड व कवठेमंकाळ रेल्वे स्टेशन येथे तिकीट आरक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी नागरीक जागृती मंचने केली आहे.
विश्रामबाग रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मची उंची वाढवून येथे पादचारी पूल बनवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
भिलवडी रेल्वे स्टेशनवर दादर-हुबळी एक्सप्रेस चा थांबा मागण्यात येणार आहे.
*सांगली मिरज येथून नवीन गाड्या सुरू करण्याचे प्रयत्न*
सांगली रेल्वे स्टेशन वरून निजामाबाद, विशाखापटनम, पुरी, विजयवाडा, हैदराबाद, सिकंदराबाद चेन्नई, मंगलुर तिरूवनंतपुरम, हावडा इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू करण्याची विनंती नागरिक जागृती मंच करणार आहे. सांगली रेल्वे स्टेशनवर आता 5 प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याने सांगली रेल्वे स्टेशन वरून नवीन गाड्या सुरू करता येतील. या सर्व गाड्या सांगली रेल्वे स्टेशनवरून सुरू होऊन मिरज जंक्शनवर थांबून पुढे जाणार असल्यामुळे सांगली व मिरज दोन्ही रेल्वे स्टेशनचा मोठा फायदा होणार आहे.
*मिरज रेल्वे स्टेशन वरून उत्तर भारत जाणाऱ्या नवीन गाड्यांची मागणी*
मिरज स्टेशन वरून सध्या धावणारी साप्ताहिक दर्शन एक्सप्रेस व मिरज-बिकानेर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना रोज धावण्यासाठी मागणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे मिरज-जयनगर प्रस्तावित एक्सप्रेस गाडी लवकर सुरू करण्याची विनंती करण्यात येईल. या व्यतिरिक्त मिरज-अमृतसर एक्सप्रेस, मिरज-नलिया एक्सप्रोस, मिरज-जामनगर-ओखा एक्सप्रेस व मिरज-जम्मूतावी एक्सप्रेस गाड्या सांगली, पुणे मार्गे सुरू करण्याची मागणी नागरिक जागृती मंच करेल